आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा अंतर्गत तळेघर येथे स्ट्रॉबेरी लागवड तंत्रज्ञान विषयी प्रशिक्षणाचे आयोजन!!

आत्मा अंतर्गत तळेघर येथे स्ट्रॉबेरी लागवड तंत्रज्ञान विषयी प्रशिक्षणाचे आयोजन!!

प्रतिनिधी -समीर गोरडे

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत जिल्ह्यातंर्गत प्रशिक्षण स्ट्रॉबेरी लागवड तंत्रज्ञान विषयी प्रशिक्षणाचे आयोजन संजय काचोळे साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे, श्रीधर काळे प्रकल्प उपसंचालक आत्मा पुणे, सुरज मडके प्रकल्प संचालक आत्मा पुणे,सतीश शिरसाट साहेब उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर, प्रदीप देसाई प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमास सूक्ष्म सिंचन कंपनी जैन इ्रीगेशन, नेटाफिम, फिनोलेक्स, रिवूलीस इ्रीगेशन यांचे प्रतिनिधी व आदिवासी भागातील स्ट्रॉबेरी लागवड करण्यास इच्छुक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…


सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रस्तावना सिद्धेश ढवळे साहेब तालुका कृषी अधिकारी आंबेगाव यांनी केली .सदर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भरत टेमकर शास्त्रज्ञ उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी स्ट्रॉबेरी पिकासाठी जमिनीची निवड खत व्यवस्थापन व स्ट्रॉबेरी पिकाचे आहारातील महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच डॉ.दर्शन कदम साहेब विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर यांनी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी रोपांची निवड व स्ट्रॉबेरी पिकावरील प्रमुख कीड व रोग व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

तसेच डोण गावचे प्रगतशील शेतकरी शंकर केंगले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी पिकाविषयी आलेले अनुभव सांगितले, सोनल कोतवाल सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी स्ट्राँबेरी लागवड प्रकल्प योजनेविषयी विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.


संजय काचोळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सदर योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी यांना आवाहन केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धेश ढवळे तालुका कृषी अधिकारी आंबेगाव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडीभाऊ पाबळे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आंबेगाव यांनी तर आभार प्रदर्शन रामचंद्र बारवे मंडळ कृषी अधिकारी यांनी केले.


सदर प्रशिक्षणासाठी सोपान लांडे मंडळ कृषि अधिकारी,निरगुडसर, चंद्रकांत डामसे कृषी पर्यवेक्षक,प्रकाश आंबेकर पर्यवेक्षक,शरद काळे,माणिक चकवे उपस्थित होते.या प्रशिक्षणासाठी कृषी सहाय्यक रोहिदास विरनक,ज्ञानेश्वर लोहकरे,युवराज बांबळे उत्तम लोहकरे, रवींद्र पारधी,अरविंद मोहरे,योगेश पारधी, दिपाली केंगले, दीपक सुपे,भरत भोईर, यांनी सहकार्य केले..

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.