आंबेगाव तालुक्यातील काठापूर बु.भोकरवाडी,गणेशनगर येथे श्री गणेश पुराण संगीतमय कथा सोहळा होतोय संपन्न!!
ह.भ.प.कविराज महाराज झावरे पारनेर यांच्या माध्यमातून संपन्न होते आहे संगीतमय कथा!!
आंबेगाव तालुक्यातील काठापूर बु.भोकरवाडी,गणेशनगर येथे श्री गणेश पुराण संगीतमय कथा सोहळा होतोय संपन्न!!
ह.भ.प.कविराज महाराज झावरे पारनेर यांच्या माध्यमातून संपन्न होते आहे संगीतमय कथा!!
काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव येथील भोकरवाडी,गणेशनगर येथे श्री गणेश पुराण संगीतमय कथा सोहळा आयोजित करण्यात आला असून ह.भ.प.कविराज महाराज झावरे पारनेर यांच्या माध्यमातून ही संगीतमय कथा संपन्न होत आहे. नागरिकांची या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून काठापूर, जारकरवाडी,पोंदेवाडी, पारगाव आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
काठापूर बुद्रुक गावातील भोकरवाडी, गणेशनगर या ठिकाणी दरवर्षी संगीतमय कथा सोहळ्याचे आयोजन केले जाते. याही वर्षी या ठिकाणी श्री गणेश, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त संगीतमय गणेश पुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .या सोहळ्याची कथा प्रवक्ते ह.भ.प. कविराज महाराज झावरे पारनेर हे असून संगीतमय पात्र रुपाने संपन्न होणार्या या सोहळ्यासाठी काठापुर बरोबरच जारकरवाडी,पोंदेवाडी,पारगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
दररोज एक हजार माणसांचे जेवण या ठिकाणी कथा संपन झाल्यानंतर नागरिकांसाठी दिले जाते. स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून या ठिकाणी पात्र रंगवली जात असून संगीतमय सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित राहत आहेत. दररोज होणारा कथा भाग या ठिकाणी पात्र रुपात दाखवला जात असल्याने प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
दरवर्षी या ठिकाणी विविध उपक्रमानी वर्धापन दिन साजरा करत असतात. याही वर्षी या ठिकाणी संगीतमय कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या आयोजनामध्ये माजी उपसरपंच विशाल करंडे, करंडे,नाथा करंडे,सुदाम करंडे,नंदहरी करंडे,राजेंद्र करंडे गणेश हिंगे,बाळु करंडे,संजय करंडे,संतोष करंडे,विठ्ठल करंडे,बबन करंडे,एकनाथ करंडे,अमोल करंडे,ज्ञानेश्वर करंडे,दत्तात्रय करंडे,सुखदेव करंडे,नवनाथ करंडे,सुभाष करंडे, दिगंबर शिंगाडे यांसह ग्रामस्थ व महिला मंडळ व्यवस्था पाहत आहेत.
यावेळी कथेला संगीतगची साथ शिवनाथ पवार, हरीदास बोराडे, आकाश वाडेकर,अमोल महाकाळ,अजित साळवे,बाळकृष्ण भोर,किरण वाडेकर हे करत आहेत.या सप्ताहाचे हे बारावे वर्ष असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहत आहेत.