लोणी (धामणी) येथील शिवडी, डोंगरभागात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन!!
लोणी (धामणी) येथील शिवडी, डोंगरभागात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन!!
प्रतिनिधी-प्रतीक गोरडे
लोणी (ता.आंबेगाव ) येथील डोंगराभाग,शिवडी वस्ती येथे शुक्रवार (दि.११) रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास योगेश वाळूंज,किशोर वाळुंज, सोमनाथ वाळूंज यांना पुन्हा एकदा बिबटयाचे दर्शन झाले. हे तिघेहीजन आपल्या शेतात थोड्या अंतरावर रात्री शेतात पाणी भरत होते.शेताच्या बांधापासूनच चराऊ रानाचा डोंगर भाग सुरु होतो.त्यामुळे दोन दिवसापूर्वी बिबट्याने ज्या ठिकाणी जर्शी गाईवर हल्ला करून गाईला ठार मारले नेमकी त्याच परिसरात बिबट्या आल्याने बिबट्याच्या वावराने शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.याच ठिकाणी दोन दिवसापूर्वी रानात चरत असणार्या जर्शी गाईवर बिबट्याने हल्ला करून गाईला ठार केले.आतापर्यंत बिबट्याने बांधन वस्ती,लंके वस्ती या ठिकाणी शेळ्या, मेंढ्यांवर हल्ला करून ठार केले.या परिसरात बिबट्याचा वाढता वावर पाहता आता वनविभागाने बघ्याची भूमिका न घेता त्वरीत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा आशी मागणी वाळूंज बंधूनी व शेतकरी ग्रामस्थांनी केली आहे.