आधीच बिबट्याचे भय!! त्यात भर पडली भटक्या कुत्र्यांची!! काठापूर बुद्रुक येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शेळी व दोन करडांचा मृत्यू!!
आधीच बिबट्याचे भय!! त्यात भर पडली भटक्या कुत्र्यांची!! काठापूर बुद्रुक येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शेळी व दोन करडांचा मृत्यू!!
आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील भोकरवाडी मध्ये भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात महिला शेतकरी भामाबाई प्रभाकर करंडे यांच्या एका शेळीचा व दोन करडांचा मृत्यू झाला असून,एक शेळी जबर जखमी झाली असून तीही मृत्यूच्या दारात आहेत.गावात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या आंबेगाव तालुक्याच्या विविध गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. एकंदरीतच तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, धाबे वाढलेले आहेत.या ठिकाणचे शिळे अन्न फेकून दिले जाते. या अन्नावर अनेक भटकी कुत्री जगत असतात. तसेच गावांमध्ये अनेक भटकी कुत्री वावरत असतात. परंतु ही कुत्री अन्न मिळाले नाही तर टोळीने इतरत्र हिंडत असतात. अशावेळी अनेक पाळीव प्राण्यांवर हि कुत्री हल्ले करतात.
काठापूर बुद्रुक येथील भोकरवाडी मध्ये गुरुवारी सायंकाळी 4:00 वाजता घरासमोर बांधलेल्या दोन मोठाल्या शेळ्या व दोन करडांवर कुत्र्यांनी हल्ला केला.त्यात एक शेळी व दोन करडे जागीच ठार झाली. तर एका शेळीला जबर दुखापत झाली असुन ही शेळी वाचण्याची कुठली शक्यता नाही.
कुटुंबातील सर्व सदस्य शेतात शेतीकाम व पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता घरासमोर बांधलेल्या शेळ्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.शेळ्यांच्या आवाजाने रस्त्यावरुन जाणारी विद्यार्थीनी रिद्धी करंडे हिने त्या शेजारील लोकांना बोलावून कुत्री हुसकावून लावली.परंतु तोपर्यंत कुत्र्यांच्या केलेल्या हल्ल्यात दोन करडांचा जागीच मृत्यू झाला. तर एक शेळी काही तासांनी दगावली तर एक शेळी मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे महिला शेतकरी भामाबाई प्रभाकर करंडे यांचे 40 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
खऱ्या अर्थाने शेळी गरीबाची गाय समजली जाते आणि अनेक महिला कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शेळीपालन व्यवसाय करतात. परंतु पाळलेला चारही शेळ्या हातातून गेल्याने कुटुंबाची आर्थिक नुकसान झाले आहे.