पारगाव तर्फे खेड येथे महिलांसाठी आरीवर्क वर्ग सुरू!
पारगाव तर्फे खेड येथे महिलांसाठी आरीवर्क वर्ग सुरू!!
प्रतिनिधी -समीर गोरडे
पारगाव तर्फे खेड ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील महिलांना मोफत आरीवर्क प्रशिक्षण देण्यात येत असून, महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यात सरपंच नंदा पानसरे यांनी केले.
यावेळी ६० महिलांनी नोंदणी केली असून प्रत्यक्षात प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली असून गावातील महिलांना स्वावलंबी व आर्थिक साक्षर करण्यासाठी ग्रामपंचायतच्या सरपंच नंदा पानसरे यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण राबविले जात आहे.
उपसरपंच सुरेश अभंग यांच्या हस्ते फीत कापून सुरुवात करण्यात आली. वेलकीन इंडिया या संस्थेच्या संस्थापिका मीनल मोढवे, अभिलाषा मोढवे,सागर नवले यांच्या संस्थेमार्फत तसेच ग्रामपंचायत सौजन्याने आरीवर्क हे प्रशिक्षण देणार आहेत. यावेळी सरपंच नंदा पानसरे,उपसरपंच सुरेश अभंग,रूपाली मानकर, वैशाली पवार,शितल पवार, अमोल मनकर, गणेश चिखले,ग्रामसेवक चारूशिला बोडरे व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.