सेवानिवृत्त अधिकारी श्री.रामदास पालेकर पाटील यांनी बटाटा पिकात घेतले विक्रमी उत्पादन!!
सेवानिवृत्त अधिकारी श्री.रामदास पालेकर पाटील यांनी बटाटा पिकात घेतले विक्रमी उत्पादन!!
मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील सेवानिवृत्त लष्करी अधिकारी रामदास पालेकर पाटील यांनी आपल्या शेतात सात कट्टे बटाटे लावले होते.त्यांनी एका कटयाला सरासरी ३० ते ३३ कट्टे गळीत काढून सात कट्याला २३१ कट्टे बटाटा काढून विक्रमी उत्पादन घेतले आहे.
साधारण सरासरी एका बटाट्याचे वजन ५००/७०० ते ९०० ग्रॅम असल्याचे पालेकर पाटील यांनी सांगितले. मांदळेवाडीसारख्या जिरायत भागात त्यांनी आपल्या शेतात बटाटयाचे विक्रमी उत्पादन काढल्याने परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांना ओळखले जाते. रामदास पालेकर पाटील हे सेवानिवृत झाल्यानंतर शिक्षण विभागात काही काळ नोकरी करून शिक्षणविस्तार अधिकारी म्हणून ते सेवानिवृत झाले.जवळजवळ २० ते २५ वर्षे ते आपल्या काळ्या आईची सेवा करतात व बटाट्याचे भरघोस उत्पादन घेतात.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील निरगुडसर,मेंगडेवाडी,जारकरवाडी,पोंदेवाडी,लाखणगाव,लोणी,धामणी,खडकवाडी,वाळुंजनगर,मांदळेवाडी, वडगावपीर,रानमळा या भागात मोठ्या प्रमाणात बटाटा लागवड केली जाते.आणि आता बर्याच ठिकाणी बटाटा काढण्याची व इतर शेतीच्या कामाची लगबग असल्याने मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकर्यांची धावपळ होत आहे.जादा मजूरी देऊन परगावाहून वाहनांची व्यवस्था करून मजूर आणावे लागतात.
सध्या बटाटा पीक परिपक्व झाले असून शेतकरी लाकडी नांगर व ट्रॅक्टरच्या साहाय्याचा वापर करून मजुरांकडून तो वेचून घेतला जातो. वेचलेले बटाटे स्वच्छ करून बाजारात विक्रीसाठी पाठवला जातो.तर काही शेतकरी शीतगृहात बटाटा साठवून ठेवत आहेत. काही व्यापार बटाटा शेतातच खरेदी करतात. रामदास पालेकर पाटील यांनी आपल्या शेतातच १८ रुपये किलो भावाने बटाटा विकला. पण बाजारात सध्या १८ ते २० रूपये किलोने बटाटा खरेदी केला जातो.
मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील सेवानिवृत्त लष्करी अधिकारी रामदास पालेकर पाटील यांच्या शेतातील बटाटा