मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी जवळे गावाने राबवली लक्ष्मी योजना!!
मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी जवळे गावाने राबवली लक्ष्मी योजना!!
ग्रामपंचायत जवळे च्या वतीने फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2026 पर्यंत लक्ष्मी योजना घोषित करण्यात करण्यात आली आहे. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य मुलींच्या जन्माचे स्वागत असून ग्रामपंचायत च्या वतीने या कालावधीमध्ये जन्माला आलेल्या जवळे गावातील मुलीच्या पोस्ट ऑफिस चे सुकन्या समृद्धी खात्यावरती पाचशे रुपये जमा करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत 24 खाते धारकांना ही रक्कम वर्ग करण्यात आली असून अजून वर्षभरात जन्माला येणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल अशी माहिती जवळे गावच्या आदर्श सरपंच वृषाली उत्तम शिंदे पाटील यांनी दिली. हा कार्यक्रम राबवत असताना निरगुडसर पोस्ट ऑफिस चे मॅनेजर बोराटे साहेब व किर्वे साहेब यांनी मोलाचा हातभार लावला सर्व लाभार्थ्यांची खाते जलद गतीने काढून ग्रामपंचायत ला सहकार्य केले.
यावेळी उपसरपंच मनीषा टाव्हरे, प्रमिला गावडे, संगीता साबळे ,चंद्रकला गायकवाड, शीला साबळे ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रेय लायगुडे, सुंनदा शिंदे अशा वर्कर,संगीता वाळुंज शालन सोनवणे,हरिचंद्र शिंदे, अमोल वाळुंज यासह ग्रामस्थ उपस्थित होते.