निरगुडसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरु माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे चित्रकला परीक्षेत यश!!
निरगुडसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरु माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे चित्रकला परीक्षेत यश!!
पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय,निरगुडसर ( ता.आंबेगाव ) येथील विद्यालायाचा ग्रेड चित्रकला परीक्षेत दुसरे वर्ष ( इंटरमिजिस्ट) यामध्ये घवघवीत यश मिळविले अशी माहिती प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी दिली आहे.
निकाल पूढील प्रमाणे- ग्रेड अ एक विद्यार्थी, ग्रेड ब दहा विद्यार्थी, ग्रेड सी आठ विद्यार्थी, एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला. असे एकूण वीस विद्यार्थी परिक्षेला बसले होते.
विद्यालयाचा एकूण शेकडा निकाल ९५ टक्के लागला असे पर्यवेक्षक संतोष वळसे यांनी सांगितले.या सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक विनोद बारवकर यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील, उपाध्यक्ष रामदास वळसे पाटील,सचिव प्रकाश तापकीर व सर्व संचालक,ग्रामस्थांनी सर्वांचे अभिनंदन केले.