लांबउडी स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे शाळेतील समीक्षा जगताप जिह्यात प्रथम!!
लांबउडी स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे शाळेतील समीक्षा जगताप जिह्यात प्रथम!!
प्रतिनिधी – समीर गोरडे
क्रीडा संकुल खेड येथे संपन्न झालेल्या यशवंतराव चव्हाण क्रीडा महोत्सवामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे शाळेने चमकदार कामगिरी केली असुन लांब उडी क्रीडा स्पर्धामध्ये मोठ्या गटातून कु. समीक्षा गोरक्षनाथ जगताप हिने 4.14 मीटर लांब उडी मारून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे.या क्रीडा महोत्सवामध्ये शिंगवे शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर उत्तुंग यश संपादन केल्याची माहिती मुख्याध्यापक नवनाथ शिनलकर यांनी दिली.
या विद्यार्थ्यांनीला मार्गदर्शन शिक्षक राजेंद्र बोंबे यांनी केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैजनाथ येंधे, उपाध्यक्ष गोरक्षनाथ जगताप, उपसरपंच हिरामन गोरडे व सर्व शिक्षक, ग्रामस्थ,पालक यांनी अभिनंदन केले.
क्रीडा महोत्सवात शिंगवे शाळेने यश संपादन केले.