आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीसामाजिक

विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी व विद्यानिकेतन पी.एम. हायस्कूल व ज्यु. कॉलेज साकोरी येथे पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात संपन्न!!

विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी व विद्यानिकेतन पी.एम. हायस्कूल व ज्यु. कॉलेज साकोरी येथे पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात संपन्न!!

विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी व विद्यानिकेतन पी. एम. हायस्कूल व ज्यु. कॉलेज साकोरी येथे पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष मा. श्री. पी. एम. साळवे सर विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीच्या प्राचार्या मा. सौ. रुपाली पवार-भालेराव ,उपप्राचार्य श्री. शरद गोरडे व पी. एम. हायस्कूल व ज्यूनियर कॉलेजचे प्राचार्य मा. श्री. रमेश शेवाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

” रंगोत्सव ” नॅशनल आर्ट कोम्पिटिशन मुबंई तर्फे आयोजित या स्पर्धेमध्ये विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीच्या २५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.त्यापैकी ८०विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. कु. मनस्वी मयूर भोर – द्वितीय क्रमांक ( स्टडी लॅम्प व ट्रॉफी ), कु. परी रुपेश पाचपुते – चतुर्थ क्रमांक ( कॅम्बो कलरिंग किट व गोल्ड मिडल ), कु. अभिज्ञा विठ्ठल डुकरे – (आर्ट मिरीट अवार्ड), कु. नम्रता दीपक खिलारी – (आर्ट मिरीट अवार्ड ) गोल्ड मिडल -२५, सिल्वर मिडल -२०, ब्रॉन्झ मिडल -१५, के जी गिप्ट – ५, सरप्राईज गिप्ट -४ त्याचप्रमाणे पी. एम. हायस्कूल व ज्यु कॉलेजच्या १५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यापैकी २३ विद्यार्थ्यानी यश संपादन केले.

कु. मयुरी रामचंद्र कांबळे – आर्ट मिरीट अवार्ड, गोल्ड मिडल -१०, सिल्वर मिडल -८, ब्रॉन्झ मिडल -४ व सरप्राईज गिप्ट -१ अशा विविध प्रकारच्या पारितोषिकांनी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले त्याचप्रमाणे रांगोत्सव तर्फे संस्थेचे अध्यक्ष श्री.पी. एम. साळवे यांना ट्रॉफी, विद्यानिकेतन अकॅडमीच्या प्राचार्या सौ. रुपाली भालेराव यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र, पी. एम. हायस्कूल व ज्यु कॉलेजचे प्राचार्य श्री. रमेश शेवाळे यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र व कलाशिक्षक श्री. विनोद उघडे सर यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकवृंद व मार्गदर्शक शिक्षक यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.