जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्याचे प्राविण्य!!

जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्याचे प्राविण्य!!
ठाणे – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षांमध्ये जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, बारा बंगाल जिमखाना कोपरी, ठाणे येथे दिनांक २२ नोव्हेंबर रोजी संपन्न झाल्या.यात स्पर्धेत ( १४,१७,१९वर्षे वयोगटातील मुले-मुली ) व ठाणे जिल्हातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या.
शहापूर तालुक्यातील मोहिली – अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित,आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलची १७ वर्ष वयोगटातील
शिवांगी सुरेश गौतम व तनिष रोशन नाळे या दोन्ही विद्यार्थिनी जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. या दोन्ही विद्यार्थिनी परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊलीच्या आशिर्वादाने, संत परिवाराच्या प्रेरणेतून, संस्थेचे अध्यक्ष, व समस्त विश्वस्त मंडळ स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष, स्थनिक सदस्य यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत प्रावीण्य मिळविले. याबद्दल दोन्ही विद्यार्थिनी सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तसेच विभागीय स्पर्धेत निवड झाली. या विद्यार्थ्यांना प्राचार्य कैलास थोरात, क्रीडा शिक्षक सरिता पाल यांनी अथक परिश्रम घेतले.