अर्थकारणआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीराजकीयसामाजिक

जिल्हास्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेत समर्थ ज्युनिअर कॉलेज मुलींचा संघ प्रथम!!

जिल्हास्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेत समर्थ ज्युनिअर कॉलेज मुलींचा संघ प्रथम!!

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नुकत्याच तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथील क्रीडा संकुलामध्ये पार पडल्या.त्यामध्ये शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेत समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे १९ वर्षे वयोगट (मुली) या संघाने प्रथम क्रमांक तर १९ वर्षे वयोगट (मुले) या संघाने द्वितीय क्रमांक पटकावल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.
समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी तांत्रिक व कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन घडवत संयमी खेळी केली.यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे जंपिंग शॉट मारत विजयश्री खेचून आणली.सातत्यपूर्ण सराव,जिद्द,चिकाटी व मेहनत या जोरावर खेळाडूंनी आत्मविश्वासपूर्वक खिलाडू वृत्तीने शूटिंग हॉलीबॉल या क्रीडा प्रकारातील सर्व नियमांची अंमलबजावणी करत हा विजय मिळवला असल्याचे क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेत विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे:-
१९ वर्ष वयोगट मुली-
आदिती गोरडे,वैष्णवी ढोबळे,अनुष्का जाधव,ऋतुजा बांगर,अमृता मुरादे,मयुरी झावरे,अस्मिता सागर,राधिका लंके,मोनिका शिरतर,जयश्री पवार.
१९ वर्षे वयोगट मुले:-
साहिल येवले,प्रणव पानसरे, तन्मय गायके,तन्मय खराडे,गौरव पवार,संदेश भालेराव,रुद्र देशमुख,बाळकृष्ण जोरी,साहिल रणसिंग,साई पोपळघट.
मुलींच्या शुटिंग हॉलीबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी दिली.सदर विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,सुरेश काकडे,प्रा.संतोष पोटे,प्रा.राजेंद्र नवले,प्रा.विनोद चौधरी,प्रा.संगीता रिठे यांनी मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.