अर्थकारणआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीसामाजिक

नेहरू विद्यालयाच्या फळभाज्या धुण्याचे यंत्र उपकरण ठरले आकर्षण!!

नेहरू विद्यालयाच्या फळभाज्या धुण्याचे यंत्र उपकरण ठरले आकर्षण!!

निरगुडसर ( ता.आंबेगाव ) येथील पं.ज.नेहरू माध्यमिक व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील आयबीटी विभागाच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी फळभाज्या धुण्याचे यंत्र उपकरण बनवून फळभाजांची स्वच्छता या यंत्र उपकरणा संदर्भात माहिती व महत्व सांगितले. पाबळ (ता. शिरूर ) येथील आयबीटी विज्ञान आश्रम आयोजीत टेक्नोव्हेशन प्रदर्शन जे.पी.नाईक सेंटर फॉर एज्युकेशन,कोथरूड-पुणे या ठिकाणी शुक्रवार (दि.२२ ) रोजी आयोजीत करण्यात आले होते.

या प्रदर्शनात राज्यातील ३५ शाळांनी सहभाग घेतला होता.या प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शेफलरचे योगेश कापसे,टाटा टेक्नोलॉजिक्सच्या उमा कृष्णन,किरण इनामदार,स्टार्स फोरमचे चैतन्य नाडकर्णी, विज्ञान आश्रम पाबळचे योगेश कुलकर्णी,ओकार बनायत,महेंद्र चौरासिया आदी मान्यवर उपस्थित होते.२०१९ पासून विज्ञान आश्रम पाबळ हे टेक्नोव्हेशन प्रदर्शन आयोजित करत आहे. फळभाज्या धुण्याचे यंत्र (vegetables washer) विद्यार्थ्यांनी आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये एक समस्या सर्व शेतकऱ्यांना होती.ती म्हणजे शेतकरी बीट पिकवतात पण त्यांना बीट स्वच्छ धुवूनच बाजारामध्ये चांगला हमीभाव भेटतो.तसेच बीट,मुळ,गाजर,आले यासारखी कंदमुळे धुण्यासाठी कोणतही यंत्र उपलब्ध नाही.शेतकऱ्यांना वॉशिंग सेंटर किंवा मग स्वतः हाताने साफ करायला लागत असे.म्हणून विद्यार्यानी शेतकऱ्यांचा विचार करून फळभाज्या धुण्याचे यंत्र उपकरण तयार केले. या यंत्रामध्ये फळभाज्या व कंदमुळे साफ होण्यासाठी ड्रम मधे ब्रश फिट केला व त्यामुळे त्यांना असलेला गाळ,माती साफ होऊन हॅण्डलच्या सहाय्याने ब्रश फिरून फळभज्या साफ होतात.यामधे विजेचा वापर केला नाही.तसेच हे यंत्र स्वतः विद्यार्थ्यांनी बनवले आहे.

या यंत्राचा नक्कीच सर्व शेतकऱ्यानं फायदा होईल. हे यंत्र प्रदर्शनातील आकर्षण ठरले होते. हे यंत्र बनविणार्या विद्यार्थांना विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे यांच्या मार्गदर्शानाखाली आयबीटी विभागाचे शिक्षक कल्पना चव्हाण, तेजस्वी दांगट, भावना कहाने, गोरक्ष टाव्हरे यांनी मार्गदर्शन केले.

पुणे येथे फळभाज्या धुण्याचे यंत्र उपकरण प्रदर्शनात सादर केलेले विद्यार्थी व शिक्षक

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.