आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

टोयोटा करीयर डे च्या निमित्ताने समर्थ संकुलातील २७ विद्यार्थ्यांची निवड!!

टोयोटा करीयर डे च्या निमित्ताने समर्थ संकुलातील २७ विद्यार्थ्यांची निवड!!

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था बेल्हे व टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि.यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.टोयोटा किर्लोस्कर मोटार या कंपनीच्या माध्यमातून समर्थ शैक्षणिक संकुलात ऑटोमोबाईल बॉडी रिपेअर व ऑटोमोबाईल पेंट रिपेअर हे एक-एक वर्षाचे दोन अभ्यासक्रम प्रशिक्षण व तांत्रिक शिक्षण विभाग,एन सी व्ही टी दिल्ली सरकारच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले आहेत.या अभ्यासक्रमांना ४० विद्यार्थी प्रवेशित झालेले होते.
कंपनीच्या वतीने अद्ययावत प्रशिक्षण उपकरणे,प्रशिक्षण सामग्री,साधने,तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन इत्यादी सर्व प्रकारच्या सुविधा या विद्यार्थ्यांना प्रदान केलेल्या आहेत.सदर अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचे आहेत.हा अभ्यासक्रम शिकत असताना टोयोटा कंपनीच्या वतीने तज्ञ मार्गदर्शक येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात.त्याचबरोबर टोयोटा कंपनीच्या अधिकृत डीलरशिप मध्ये जवळपास एक महिनाभर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रोग्रॅम तसेच प्रशिक्षण दिले जाते.त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होत असते.सर्वसामान्य विद्यार्थी ज्यांना कमी कालावधीमध्ये कौशल्य प्राप्त करून रोजगार मिळवायचा असतो अशा विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.या अभ्यासक्रमांना प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना टोयोटा मार्फत १०० टक्के रोजगाराची संधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो.ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि कुशल व सक्षम होण्यासाठी प्रशिक्षित करणे हे आमच्या संस्थेचे ब्रीद आहे असे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले. सदरच्या कॅम्पस ड्राइव्ह मध्ये २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
शॉ टोयोटा पुणे सोहेल सय्यद,ज्ञानेश्वर दुडे,तन्मय किर्‍हे, किरण साठे या विद्यार्थ्यांची बॉडी रिपेयर तसेच विक्रांत दांगट,शुभम करंजेकर,अविष्कार तट्टू या विद्यार्थ्यांची पेंट रिपेअर कॅटेगरी मध्ये,तर शरयू टोयोटा पुणे येथे ओमकार शेळके,गणेश पिंगट,आदित्य दिघे,संदेश शिनारे,आवेश बेपारी,ह्या विद्यार्थ्यांची बॉडी रिपेयर कॅटेगरी मध्ये तर रियान शेख,ओंकार विश्वासराव,सूरज शिंदे,अल्पेश तांबोळी,यांची पेंट रिपेअर कॅटेगरी मध्ये तर सोनक टोयोटा बावधन, पुणे मध्ये मयुर दैने,जिवन ढेपले,अक्षय शिंदे ,रोहन राहणे ,कृष्णा मंडलिक यांची बॉडी रिपेयर या कॅटेगरी मध्ये तर राजयोग टोयोटा कात्रज , पुणे मध्ये तेजस खाडे,अक्षय मदगुले, आदेश चव्हाण,यांची पेंट रिपेअर कॅटेगरी मध्ये निवड करण्यात आल्याची माहिती प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी दिली.
या विद्यार्थ्यांना उप प्राचार्य विष्णू मापारी,स्वप्नील कवडे,अमोल करंजेकर यांनी प्रशिक्षण दिले.
या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी सर्व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले व सातत्यपूर्ण काम हाच यशाचा गाभा असून त्याचे उदात्तीकरण व अंमलबजावणी यापुढेही अशीच वृद्धींगतपणे होवोत अशा सदिच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.