आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील धामणी गावच्या उपसरपंचपदी श्री.अक्षय शिवाजीराजे विधाटे यांची निवड !!

आंबेगाव तालुक्यातील धामणी गावच्या उपसरपंचपदी श्री. अक्षय शिवाजीराजे विधाटे यांची निवड !!

आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील धामणी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत सभागृहात पार पडली.निवडणुकीत अक्षयराजे शिवाजी विधाटे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच संतोष करंजखेले यांनी राजीनामा दिला होता.त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांच्या नेतत्वाखाली घेण्यात आली. निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून ग्रामसेवक ज्योतिराम बोर्डे यांनी काम पाहिले.

निवडीप्रसंगी बोलताना उपसरपंच अक्षयराजे विधाटे यांनी बोलताना सांगितले की, गावच्या विकासात मोलाचे काम करुन गावाला साजेसे काम करेल. महिला व शालेय विद्यार्थी यांच्या साठी विवीध प्रशिक्षण आयोजित करुन त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवुन देईल. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत घेऊन जाईल.


त्याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, माजी सरपंच सागर सुनील जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव, माजी उपसरपंच मिलींद शेळके, दत्ता गवंडी, निलेश रोडे , महेश भूमकर,संगिता विधाटे ग्रामपंचायत सदस्या जयश्री विधाटे, कविता बढेकर, उषा बोऱ्हाडे,सुरेखा रोडे, सुमन पंचरास ‘राजेंद्र घोलप, श्रीकांत विधाटे , विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन दीपक जाधव ,शाखाप्रमुख दिपक जाधव, मा.ग्रा.सदस्य आनंदा जाधव,ज्ञानेश्वर विधाटे, सोसायटी तज्ञ संचालक सुभाष नेते,राहुल जाधव बाळासाहेब विधाटे, शांताराम रोडे पोपट विधाटे , रोहित भुमकर , हरिष विधाटे ,गणपत भुमकर ,ज्ञानेश्वर विधाटे दिलिप रोडे गणपत विधाटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.