आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक शैक्षिणक व क्रीडा संकुलात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न !!”आत्मा नामाच्या जयघोषाने दुमदुमला संकुलाचा परिसर”

आत्मा मालिक शैक्षिणक व क्रीडा संकुलात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न !!”आत्मा नामाच्या जयघोषाने दुमदुमला संकुलाचा परिसर”

शहापूर-शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित(कोकमठाण ),आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शाखा मोहीली -अघई ता शहापूर जि. ठाणे येथे परमपूज्य सद्गुरु आत्मामालिक माउलींच्या कृपाशीर्वादाने ,समस्त संत परिवाराच्या प्रेरणेने, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब, समस्त विश्वस्त मंडळ व स्थानिक व्यवस्थापन समिती शाखा कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.


या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी व बाल-गोपालांनी विठ्ठल -रुखुमाई, संतांचे व वारकरीची वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभाग नोंदवला. यावेळी आत्मा नामाच्या जयघोषाने संकुलाचा परिसर दुमदुमून गेला.आषाढी एकादशीच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. संकुलातील आत्मा मालिक मेडीटेशन हॉलमध्ये प्रतिमा पूजन, संत पूजन करून भजन,प्रवचन,फुगडी ,गोल,रिंगण या विविध कार्यक्रमांमध्ये हजारो आत्मा प्रेमी भक्तांचा सोहळा रंगला होता.संकुलामध्ये संत पिठाच्या संत भारत माता तसेच बाल सन्यासी संत व संकुलाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब, स्थानिक समिती सदस्य अनंत गायकवाड, प्रवीण मोरे शैक्षणिक संचालक डॉ.डी.डी.शिंदे, जनरल व्यवस्थापक गुलाब हिरे,आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य कैलास थोरात,पंकज बडगुजर, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अनिल पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व संकुलाच्या परिसरात पालखी दिंडी काढण्यात आली.यावेळी प्रमूख मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व, महाराष्ट्रातील संत परंपरा, व दिंडीचे महत्त्व सांगितले . यावेळी स्वरांजली ग्रुपच्या वतीने आत्मनामाचे भजन, किर्तनरुपी सेवा सादर केली. संगीत संयोजन सुयोग खंडागळे,लक्ष्मण साळुंके, समाधान काटे, एकनाथ गोधडे यांनी केले.कार्यक्रमाची सूत्रसंचालन दिपाली खांडगे,मोहन साबळे यांनी केले.


यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रमुख पदाधिकारी, संकुलातील सर्व प्राचार्य , शिक्षक वृंद,वसतिगृह शिक्षक , इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.