आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिंगवे(पारगाव) शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत परीक्षेत घवघवीत यश!!तेरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले!!

शिंगवे(पारगाव) शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत परीक्षेत घवघवीत यश!!तेरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

शिंगवे पारगाव(ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीचे तब्बल तेरा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले असून तालुक्यात गुणवत्ता यादीत सर्वांत जास्त मुले येणारी दुसऱ्या क्रमांकाची शाळा ठरली अशी माहिती मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर यांनी दिली आहे.

शिंगवे पारगाव (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाचवीचे ४० विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल ८७.५ टक्के लागला. आराध्या राहुल गुरसळ२६८गुण, पूर्वा विश्वास वाव्हळ२६४गुण, शिवानी किशोर गोरडे२६४गुण, आयुष शशिकांत गाढवे२६२गुण, वरद रूपेश लोंढे२६२गुण, अफसान सुलतान शाह२५८गुण, आराध्या रमेश डोके२५८गुण, आर्या समीर गोरडे२५६गुण, शिवम संतोष बोऱ्हाडे२५४गुण, आर्यन विजय चव्हाण२५०गुण, शौर्य राजेंद्र बोंबे२४८गुण, सुशांत निवृत्ती पाबळे२४८गुण, वरद सचिन गोरडे२३८गुण हे तेरा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीमती सुषमा कदम या शिक्षिकेने मार्गदर्शन केले. तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिकेचे सरपंच उपसरपंच, पोलिस पाटील,शाळा समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,पालक,ग्रामस्थयांसह आदींनी अभिनंदन केले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.