आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

कसारा रेल्वस्थानकालगत पंचवटी एक्स्प्रेसची कप्लिंग तुटल्याने; प्रवाशांची धावपळ!!

कसारा रेल्वस्थानकालगत पंचवटी एक्स्प्रेसची कप्लिंग तुटल्याने; प्रवाशांची धावपळ!!

नाशिक (प्रतिनिधी)- नाशिकहून मुंबईकडे रवाना झालेल्या पंचवटी एक्स्प्रेसला कसारा रेल्वस्थानकालगत अपघात झाला. सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही व दुर्घटना घडली नाही.

आज सकाळीच्या सुमारास पंचवटी एक्स्प्रेस नाशिकरोडहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. देवळाली कॅम्प, इगतपुरीनंतर कसारा रेल्वस्थानका सोडल्यानंतर पंचवटी एक्स्प्रेसच्या इंजिनला लागून असलेल्या एका डब्याचे कपलिंग तुटल्याने ही घटना घडली.

त्यामुळे इंजिनसह एक डबा पुढे गेला, तर मागे असलेले डबे जागच्या जागी थांबले. आज सकाळी पंचवटी एक्स्प्रेसने कसारा स्थानक सोडल्यानंतर सकाळी पावणे नऊच्या दरम्यान इंजिन व त्याला लागून असलेला सी-2 हा डबा पोल नंबर 119/46 जवळ कपलिंग तुटल्यामुळे इंजिनसह पुढे गेला व इतर डबे तसेच मागे राहिले. एखाद्या रेल्वेचे कपलिंग तुटल्यानंतर तत्काळ ब्रेक लागतो आणि गाडी थांबण्याची व्यवस्था असल्याने पंचवटी एक्स्प्रेसचे इतर डबे सुदैवाने पुढे गेले नाहीत. हा अपघात कसारा घाटात झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती; मात्र दैव बलवत्तर म्हणून ही घटना टळली.

या अपघाताची माहिती मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी रेल्वेचे पथक पाठवून पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग व्यवस्थित करून ही गाडी 9 वाजून 35 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना केली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.