आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये ड्रोनच्या गिरट्या!! नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये ड्रोनच्या गिरट्या!! नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण!!

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर,पोंदेवाडी,खडकवाडी व जारकरवाडी या गावांमध्ये रात्रीच्या वेळी गेले दोन दिवस ड्रोनच्या गिरट्या सुरू असून रात्री 10:30 नंतर हे ड्रोन कशासाठी फिरतात याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी काही गावांमध्ये ड्रोनच्या गिरट्या वाढल्या आहेत. तसाच प्रकार आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर, पोंदेवाडी,खडकवाडी व जारकरवाडी या परिसरात दिसून येत आहे. काठापूर पोंदेवाडी खडकवाडी जारकरवाडी या गावाच्या मध्यभागी असणाऱ्या डोंगराच्या परिसरात विशेष करून हे ड्रोन फिरताना दिसून येतात. या डोंगराच्या चारही बाजूला चार गावे असून याच डोंगराच्या सभोवतालच्या परिसरात या गिरट्या दिसून येत आहेत.त्यामुळे नक्की हे ड्रोन रात्री कशासाठी उडतात याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम व भीती निर्माण झाली आहे.

एकावेळी तीन-तीन ड्रोन या परिसरात उडत असल्याने नागरिकांनी एकमेकांना फोन करून याबद्दल माहिती दिली. रात्रीच्या वेळी उडणारे हे ड्रोन उंचीवरून उडत असल्याने या ड्रोनचा आकार व क्षमता जास्त असू शकते. इतक्या मोठ्या क्षमतेचे ड्रोन हे या परिसरातील फोटोग्राफर यांचे नसणार आहे. त्यामुळे स्थानिक कोणीही मुद्दाम असा काही प्रकार करेल अशीही शक्यता कमी आहे.त्यामुळे इतक्या मोठ्या क्षमतेचे ड्रोन या परिसरात का फिरतात याबाबत नागरिक संभ्रमात आहेत.

सध्या जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रखत्री ड्रोनच्या गिरट्या वाढल्याने आणि अजून पर्यंत कोणताच ड्रोन हाती न लागल्याने किंवा कोणतीच माहिती न मिळाल्याने शासनाने व प्रशासनाने यावर लक्ष देऊन हा काय प्रकार आहे. हा नागरिकांना सांगितला पाहिजे असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणने आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.