आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जारकरवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा!!

प्रा.सुनील कापडी यांना सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन दिल्ली यांच्या वतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर!!

जारकरवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा!!

प्रा.सुनील कापडी यांना सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन दिल्ली यांच्या वतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जारकरवाडी गावातील प्रा. सुनील कापडी यांना सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन दिल्ली यांच्या वतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे.

नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या या स्पर्धेत प्रा. सुनील कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली ३४० विद्यार्थी सायन्स ऑलिंपियाड च्या गुणवत्ता यादीत आले आहेत. पुण्यातील ८८३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

मुलांच्या विविध गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी फाउंडेशन ही स्पर्धा आयोजित करत असते. शिक्षक म्हणून भूमिका बजावत असताना स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांचा सहभाग वाढावा यासाठी प्रा.सुनील कापडी हे नेहमीच प्रयत्नशील असतात.मागील वर्षी झालेल्या या स्पर्धेत कापडी सरांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी मिळवलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

हे सर्व विद्यार्थी प्रा.कापडी सर यांच्या प्रेरणेने,मार्गदर्शनाने गुणवत्ता यादीत आल्याने तसेच पुणे जिल्ह्यातील एवढे विद्यार्थी प्रथमच या स्पर्धेत सहभागी झाल्याने प्रा.सुनील कापडी यांना सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन दिल्ली यांच्यावतीने उत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्यांच्या या सन्मानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.