आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

द्वितीय राष्ट्रीय योगासन प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम स्तर अभ्यासक्रमात योग प्रशिक्षक पुरूषोत्तम पानबुडे सहभाग!!

द्वितीय राष्ट्रीय योगासन प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम स्तर अभ्यासक्रमात योग प्रशिक्षक पुरूषोत्तम पानबुडे सहभाग!!

ठाणे – द्वितीय राष्ट्रीय योगासन प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम स्तर अभ्यासक्रम २०२४ नेताजी सुभाष राष्ट्रीय खेळ संस्थान (एनआयएस) पटियाला पंजाब येथे दि.९/६/२०२४ ते १७/०६/२०२४ या दरम्यान योगासन प्रशिक्षक कार्यक्रम संपन्न झाला.

या अभ्यासक्रम कार्यक्रम भारत सरकार द्वारा, युवा कल्याण व खेल मंत्रालय अंतर्गत प्रशिक्षक कार्यक्रम योगासन भारत द्वारा आयोजीत करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी संचालक योगासन भारतचे सचिव डॉ. जयदीप आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रम झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमांत २९ राज्यातील १४० प्रशिक्षकांनी सहभाग नोंदवला.यात शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलतील योगा प्रशिक्षक पुरुषोत्तम पानबुडे सहभागी होऊन राष्ट्रीय योगासन प्रशिक्षण पूर्ण केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब, स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब, स्थानिक विश्वस्त अनंत गायकवाड ,प्रवीण मोरे, शैक्षणिक व्यवस्थापक डॉ.डी डी शिंदे सर, आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अनिल पाटील ,आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य कैलास थोरात ,ज्युनिअर कॉलेज प्राचार्य पंकज बडगुजर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व क्रीडा विभागातील सर्व क्रीडा शिक्षक यांनी पुरुषोत्तम पानबुडे यांचे कौतुक केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.