आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूल शाखा शहापुरच्या विद्यार्थीचे एस. एस. सी परीक्षेत घवघवीत यश!!

आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूल शाखा शहापुरच्या विद्यार्थीचे एस. एस. सी परीक्षेत घवघवीत यश!!

शहापुर-शहापुर तालुक्यातील मोहिली – अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकामठान)संचलित,आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शाखा मोहिली – अघई येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एस. एस. सी परीक्षेत घवघवीत यश मिळवले.

यात आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल १०० % लागला असून यात शालेय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्रतीक दिनेश बोस ९२.८०%, द्वितीय क्रमांक तेजस सुनील थापड ८९.४०%, तृतीय क्रमांक.स्वराज अशोक कोठारी ८७%, चतुर्थ क्रमांक प्रशिक विजय बैसाने ८५.४०%, व पाचवा क्रमांक कृत्तिका अनिल पुंजारा ८४.८०%मिळवला. तसेच सर्वच विद्यार्थ्यांनी सर्व विषयात गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले असून त्यांना प्राचार्य कैलास थोरात , प्राचार्य पंकज बडगुजर तसेच शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले असून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संत भारत माता,संकुलाचे शैक्षणिक संचालक प्राचार्य डॉ डी.डी शिंदे, व्यवस्थापक गुलाब हिरे, एच.आर मॅनेजर माधव मुंडगे, राहूल जाधव यांनी केले.

सर्व उत्तीर्ण व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे साहेब, तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब,अनंत गायकवाड, प्रवीण मोरे आदींनी केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.