नाते कलेचे त्या रक्ताशी – ढोलकी सम्राट शैलेश भंडारे
साभार लेख - शाहीर खंदारे

कलेचे त्या रक्ताशी – ढोलकी सम्राट शैलेश भंडारे
तमाशा रंगभूमीच्या प्रेमी रसिकांनो, “नाते कलेचे त्या रक्ताशी “या लेखमालेचे आजचे आकर्षण…
तमाशात ढोलकी वाजली की,रसिकमनाला आनंद मिळतो असे ढोलकी वाद्यात तयार असलेले, संगीताचे सर्व गुण आत्मसात करून तुरेवाले भाऊ फक्कड भंडारे यांच्याच घराण्यातील ढोलकी सम्राट शैलेश भंडारे मु. पो. नारायणगाव जि. पुणे होय.
त्यांच्या आईचे नाव सोनुबाई.शैलेशभाऊंना २मुले आहेत .शैलेशभाऊंना वयाच्या दहाव्या,वर्षापासून संगीत वाद्याचा वारा अंगी संचारला. त्यांचे वडील लक्ष्मणराव आणि गाडेकर गुरुजी शिकवण्याचे वस्ताद झाले. शैलेश भाऊ जसे जसे मोठे झाले तशी तशी वाद्याची कला अवगत झाली. नंतर त्यांनी कै.विठाबाई नारायणगावकर , सौ. मंगला बनसोडे, गणपतराव व्ही.माने, कलाभुषण रघुवीर खेडकर, कै. चंद्रकांत ढवळपुरीकर, आनंद महाजन, भिका भीमा सांगवीकर, दत्त्तामहाडिक पुणेकर इ. तमाशा फडात ढोलकीच्या वाद्यवर आपले नांव रसिकांच्या ओठावर ठेवले असून,
सध्या (कलाभूषण) मा. रघुवीर खेडकरांच्या तमाशाला त्यांच्या ढोलकीचे योगदान चालू आहे. त्यांचे शिक्षण फक्त चौथी पास असून ,ते नाल, ढोलक, तबला, ट्रिबल, ड्रमसेट इ. वाद्य वाजवन्यात तरबेज असून, वगनाट्यात व्हीलनचीही भुमिका करतात. त्याच प्रमाणे तमाशा क्षेत्रातील, लावणी क्षेत्रातील, ऑर्केस्ट्रा, जागरण गोंधळ, नाट्यपथ ,शाहिरी पोवाडा अशा विविध कलाप्रकारातून रंगभूमीवर ४५ वर्ष रसिकसेवा करीत आहेत.
इतक्या वर्षांच्या कालखंडात कित्येक नृत्यांगना ढोलकीच्या वाद्यातून तालबद्ध केल्या. तमाशा कलेसाठी भंडारे घराणे भारत भूमीत जन्माला आले हे आपल्या रसिकांचे भाग्याचं…शैलेश भाऊ लागवळ, लावनी, छक्कड, सवाल जबाब, जून्या पारंपरिक गणगवळणीत ढोलकीची साथ देऊन ,तमाशाकलेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
शैलेशभाऊ म्हणतात जुन्या वाद्यांचा कलेचा रसिक चाहता होता.पण अलीकडे 20 वर्षांपासून सर्व वाद्य रिमिक्स झाले. या आधुनिक इलेक्ट्रिक वाद्यामुळे आमच्या सारख्या चमडी वाद्ये वाजविणा-या पाठीमागे सरकावे लागत आहे.पण चामडी वाद्याशिवाय तमाशा कलेला शोभाच नाही हे अगदी नक्की, असे शैलेश भाऊ म्हणतात…
शैलेश भाऊंनी 19 शिष्य तयार केले आहेत.2007 साली पु. ल. देशपांडे नाट्यगृह मुंबई येथून, तमाशा लोककला ढोलकी वादक म्हणून चंदनशिवे साहेबांनी नियुक्ती केली. त्याठिकाणी तमाशा शिबिर भरवताना हलगी-ढोलकी शिक्षण देण्यासाठी व तमाशाचा बाज दाखवण्यासाठी भंडारे यांची नेमणूक केेली जाते. शैलेश भाउंचे वय 58 वर्षाचे असून, ते रसिकांची 45 वर्षे सेवा करीत आहेत. त्यांची राहणी साधी असून, मालकाशी एकनिष्ठता, कलाकारांवरती प्रेम, सुखदुःखाची जाणीव ,नेहमी खरे बोलतात, शैलेश भाऊस्टेजवर येताच रसिक ढोलकीच्या संगीतात मंत्रमुग्ध होऊन मान डोलायला लागतो.तमाशाकलेला वाचवायचे असेल शैलैश भंडारे सारखे कसलेले ढोलकीसम्राट रंगमंचावर जास्त वेळ ढोलकीतून रसिकसेवा करताना दिसले पाहिजेत.
अशा ढोलकी सम्राटाच्या हातून रसिकांची, रांगदेवतेची सेवा घडो त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचे नाव महाराष्ट्रात झळकत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
🙏🏻😊
लेखक ✍🏻
शाहीर खंदारे
ता.नेवासा.
मो.8605558432