आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिरूर लोकसभा मतदारसंघात लागले खासदार शिवाजीराव (दादा) आढळराव पाटलांच्या विजयी अभिनंदनाचे फ्लेक्स!!

शिरूर लोकसभा मतदारसंघात लागले खासदार शिवाजीराव (दादा) आढळराव पाटलांच्या विजयी अभिनंदनाचे फ्लेक्स!!

लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे.या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या अभिनंदनचे फ्लेक्स लागले आहेत.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) चौकात खासदार शिवाजीराव (दादा)आढळराव पाटील यांची चौथ्यांदा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारे फ्लेक्स लागले आहेत.

4 जूनला होणाऱ्या मतमोजणीत आढळराव पाटील हे 1,00,000 पेक्षा जास्त मताधिक्याने शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून संसदेत जाणार असा ठाम विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.

मागील निवडणुकीत आढळराव पाटलांचा पराभव होऊन देखील पाच वर्ष त्यांनी जनसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत,मतदार संघातील पायाभूत सुविधा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी सतत प्रयत्न केलेले आहेत.त्यांचा सततचा जनसंपर्क, जनसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव सुरु असलेला जनता दरबार,मतदार संघातील विकासकामे करण्यासाठी पदावर नसताना देखील महायुती सरकारच्या माध्यमातून आणलेला कोट्यावधी रुपयांचा निधी, कोरोना काळात स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता जनसामान्य लोकांसाठी केलेले अपार कष्ट, दुष्काळग्रस्त भागात स्वतः खर्च करून सुरू केलेले पाण्याचे टँकर, नैसर्गिक,मानवनिर्मित आपत्तीत क्षतिग्रस्त लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

निवडणूक प्रचार कालावधीत महायुतीतील सहभागी सर्व पक्षांनी व त्यांचा कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेउन केलेला प्रचार तसेच विकासकामांच्या बाबतीत आढळराव पाटलांचे नाणे हे खणखणीत आहे आणि याचाच परिपाक म्हणून या सर्व बाबींचा विचार करता आढळराव पाटील हे 1001% लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील यात आम्हाला कुठलीही शंका नसल्याचे काळूराम लोखंडे, बजरंग देवडे, विशाल ढोबळे,सुरेश ढोबळे, राजु ढोबळे,किरण ढोबळे,दिलीप लोखंडे,निवृत्ती ढोबळे ,प्रशांत पोंदे यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.