आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस महिला पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.सौ.रूपालीताई दत्तात्रय भोजने यांची नियुक्ती!!प्रगतशील जारकरवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा!!

राष्ट्रवादी काँग्रेस महिला पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.सौ.रूपालीताई दत्तात्रय भोजने यांची नियुक्ती!!

प्रगतशील जारकरवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा!!

राष्ट्रवादी काँग्रेस महिला पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.सौ.रूपालीताई दत्तात्रय भोजने यांचे नियुक्ती करण्यात आली.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष मोनिका हरगुडे यांच्या सहीने भोजने यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ.रुपाली दत्तात्रय भोजने यांनी बी.ए.एल.एल.बी. आणि जर्नालिझमचे शिक्षण घेतले आहे.आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावच्या त्या पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच आहेत. या पदाच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांशी संलग्न राहुन त्यांनी पाच वर्षात १८ ते २० कोटी रुपयांची विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत

दारूबंदीचा आणि फ्लेक्स बंदीचा ठराव,संविधान शिल्प,महिलांसाठी हिरकणी कक्ष,विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी तसेच यूपीएससी अभ्यासिका,४६,००० झाडांचे वृक्षारोपण, वॉर्डनिहाय ग्रामस्थांसाठी सर्व स्थानिक अधिकाऱ्यांसह जनता दरबार अशी भरीव कामे त्यांनी केली आहेत.

आदर्श सरपंच,समाजभूषण आणि अहिल्यादेवी होळकर पुरस्कार ,रोखठोक आदर्श जोडी पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, मा.खा. शिवाजीरावदादा आढळराव पाटील यांचे त्यांना आजवर विविध विकासकामासाठी मार्गदर्शन लाभले आहे.त्यांच्या या सर्व भरीव कामांची आणि कर्तृत्व,नेतृत्वाची यांची दखल घेत त्यांना या पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांचे पती१७ वर्ष ग्रामसेवक,१२ वर्षे हिंजवडी व पिरंगुट येथे ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी म्हणून मुळशी तालुक्यातील कडक व शिस्तप्रिय, कार्यक्षम अधिकारी म्हणून दत्तात्रय भोजने यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा रुपाली भोजणे यांना होणार आहे.भोजने यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.