आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी(ता.आंबेगाव) येथे ८ एप्रिलला सोमवतीचे शाहीस्नान,पालखी व महाप्रसादाचे आयोजन!!

धामणी(ता.आंबेगाव) येथे ८ एप्रिलला सोमवतीचे शाहीस्नान,पालखी व महाप्रसादाचे आयोजन!!

आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे फाल्गुन कृष्ण पक्ष सोमवती ८एप्रिल २०२४ रोजी अमावस्येला खंडोबाच्या पंचधातुच्या मुखवट्याला शाहीस्नान,पालखीची वाजतगाजत मिरवणूक व मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्याचा निर्णय कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात आयोजित केलेल्या ग्रामस्थ,देवस्थानाचे सेवेकरी,खांदेकरी,मानाच्या काठीचे मानकरीव पंचक्रोशीतील भाविकांच्या बैठकीत घेण्यात आला.

मराठी महिन्याच्या पंचागानुसार फाल्गुन महिन्यातील शेवटची व इंग्रजी महिण्यातील सन २०२४ मधील पहिली सोमवती अमावस्या ८ एप्रिलला सोमवारी पहाटे ३ वाजून २१ मिनिटांनी उगवत्या अमावस्येला सुरुवात होत आहे. या सोमवतीचा कार्यकाळ सोमवारी रात्री ११ वाजून५०मिनिटापर्यत असून संपूर्ण दिवसभर सोमवतीचा कार्यकाल असल्याने सोमवतीच्या या दिवशी शाहीस्नानात सहभागी झाल्यानंतर भाविकांच्या कष्टाला मुक्ती मिळते व अन्नदानात सहभागी झाले तर आपला पितृदोष जाऊन दैनदिन कार्यकाळात यश प्राप्त होते अशी भाविकांची निस्सीम श्रध्दा आहे.

सोमवतीला खंडोबा म्हाळसाई व बाणाईच्या सर्वांगसुंदर मुखवट्याला शाहीस्नान घालण्यासाठी व पालखी महाप्रसाद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुणे,नगर,नाशिक जिल्ह्यातील भाविक आवर्जुन उपस्थित राहतात.सोमवतीच्या दिवशी ८एप्रिल रोजी पहाटे मुख्य मंदिरात खंडोबाचा अभिषेक व महाआरती झाल्यानंतर मंदिरातून खंडोबा,म्हाळसाई व बाणाईचे पंचधातूचे सर्वांगसुंदर मुखवटे वाजतगाजत देवमळ्यातील विहीरीवर आणण्यात येऊन त्या ठिकाणी असलेल्या व नवीन बांधलेल्या सोमवतीच्या ओट्यावर मुखवट्यांना शाहीस्नान पारंपारिक पूजा व महाआरती होणार आहे.

त्यानंतर देवाचे काठीचे मानकरी,सेवेकरी,खांदेकरी व नगर,नाशिक व पुणे जिल्ह्यातील कुलदैवत असलेल्या कुळांचा व उपस्थित सर्व भाविकांचा व ग्रामस्थांचा देवस्थानाच्यावतीने देवाची मानाची टाँवेल,टोपी, व महिला भाविकांना शाल देऊन सत्कार करण्यात येणार असून त्यानंतर धामणीच्या पेठेतून पालखीची लोणी,धामणी,संविदणे,कवठे येथील देवाचे मानकरी पंचरास मंडळीच्या पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढली जाणार आहे.

त्यानंतर उपस्थित सर्वाना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी व ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ धामणी,शिरदाळे,पहाडदरा व ज्ञानेश्वर वस्ती यांनी व देवाचे सेवेकरी भगत,तांबे,वाघे व वीर, सर्व ग्रामस्थ मंडळीने केले आहे.यावेळी ग्रामस्थ,मानकरी,सेवेकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.