आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

कलिंगड पीक देते आहे शेतकऱ्यांना आर्थिक आधार!!कलिंगड पिकाकडे तरुणांचा कल!!

कलिंगड पीक देते आहे शेतकऱ्यांना आर्थिक आधार!!

कलिंगड पिकाकडे तरुणांचा कल!!

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये लोणी,धामणी,खडकवाडी,वाळुंजनगर वडगावपीर,रानमळा या दुष्काळी भागामध्ये भाजीपाला पिकाशिवाय शेतकरी वर्ग दुसऱ्या पिकांकडे वळत नाही, पण मागील तीन वर्षांमध्ये शेतीमालाला हवा तसा बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे पारंपारिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर तरुण वर्गाने फळ पिकाकडे लक्ष केंद्रित करून कलिंगड शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्या मधुन खर्च वजा दोन लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळाले आहेत.

एकरी 26 ते 27 टन कलिंगडाचे उत्पादन त्यांना मिळाले आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने सहा फुटाच्या अंतरावर बेड तयार करून त्यामध्ये खतांचा बेसल डोस टाकल्यानंतर ड्रिप आणि मल्चिंग पेपर करून कलिंगडाची लागवड केली त्यामध्ये लागणारे सर्व वॉटर सोलिबल जयेशशेठ यांचे स्वतःचे असणारे मोरया फर्टीलायझर या दुकानातून घेऊन विविध फवारणी वातावरणातील बदल यावरती मात करत यशस्वी कलिंगड उत्पादन जयेश वाळुंज यांनी घेतले.त्यामध्ये एका एकरसाठी 70 ते 80 हजार रुपये खर्च आला.त्यामध्ये पाणी व्यवस्थापन,खत व्यवस्थापन लोणी विविध सेवा सहकारी सोसायटीचे संचालक तानाजीशेठ वाळुंज यांनी केले. भरघोस उत्पादन घेतल्याबद्दल वाळुंजनगरचे मा.सरपंच महेंद्रशेठ वाळुंज, चेअरमन श्री दिपकशेठ वाळुंज यांनी तसेच इतर शेतकऱ्यांनी जयेश यांचे कौतुक केले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.