ताज्या घडामोडीसामाजिक

श्री शिवाजी विद्यालय व ज्युनि. कॉलेज धामणी (ता.आंबेगाव) शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा!!

श्री शिवाजी विद्यालय व ज्युनि. कॉलेज धामणी (ता.आंबेगाव) शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा!!

आंबेगाव तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय व ज्युनि.कॉलेज धामणी शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला.सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी व व्यावहारिक ज्ञान अवगत होण्याच्या दृष्टीने विद्यालयात बाल आनंद मेळावा मोठ्या आनंदाने साजरा झाला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. त्यामध्ये भाजीपाला,फळे, खाऊचे स्टॉल व फनी गेम याचा सहभाग होता.

दैनंदिन जीवनात विद्यार्थी शालेय शिक्षणात अभ्यास करत असतात. मात्र प्रत्यक्षपने बाहेरच्या जगात वावरत असताना त्यांना व्यवहार ज्ञान होणे गरजेचे असते. कोणताही व्यवहार करत असताना किती पैसे घेतले किती परत केले यामुळे त्यांचे गणित सुधारते. शिवाय एखादी वस्तू विकण्याची अथवा विकत घेण्याची त्यांची मानसिकता तयार होते. हिच प्राथमिकता लक्षात घेऊन असे उपक्रम राबवले जात असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य श्री गायकवाड डी.आर.सर यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमासाठी सरपंच, उपसरपंच, धामणी, शिरदाळे, पहाडदरा तसेच ग्रामपंचायत सदस्य, शालेय विविध समितीचे सदस्य व पालक वर्ग उपस्थित होते.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.