ताज्या घडामोडीसामाजिक

आंबेगाव तालुक्यातील धामणीच्या म्हाळसाकांत खंडोबाच्या चरणी धर्मनाथबीजेला नवी पालखी!!

आंबेगाव तालुक्यातील धामणीच्या म्हाळसाकांत खंडोबाच्या चरणी धर्मनाथबीजेला नवी पालखी!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरासाठी भाविकांच्या व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून नव्याने पितळाची अत्यंत सुबक खंडेरायाची पालखी तयार केलेली असून माघ शुक्ल पक्ष द्बितीया धर्मनाथ बीजेला रविवारी (दिनाक ११फेब्रुवारी २४) खंडोबाच्या मुखवट्याची या पालखीतून मिरवणूक काढण्यात येऊन नवीन पालखी म्हाळसाकांत देवस्थान चरणी अर्पण करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थ व श्री खंडोबा देवस्थानाचे सेवेकरी भगत,तांबे,वाघे वीर मंडळीनी सांगितले.

धामणी येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान हे पुणे,नगर,व नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे कुलदैवत असून माही पुनव,चंपाषष्ठी व सोमवतीला काढण्यात येत असलेल्या देवाच्या पालखीला व देवकार्याला भाविकांची मोठी गर्दी होत असते.

देवाच्या पालखीचे व मानाच्या काठीचे मानकरी मंडळीनी व भाविकांनी पालखी नवीन करण्याची ग्रामस्थांना मागील वर्षाच्या माहीपुनवेला विंनती केलेली होती.गावकर्‍यांनी भिलारेवाडी ( कात्रज,पुणे) येथील कारागीर राजूभाई मिस्री आणि त्यांचे बंधू रमेशभाई व प्रकाशभाई यांच्यावर नवीन पितळी पालखी करण्याची जबाबदारी सोपवलेली होती.याबाबत कारागीर राजू मिस्री म्हणाले,आमचा गेल्या दोन पिढ्याचा कला संस्कृतीचा असणारा अभ्यास,आळंदी व देहू येथील माऊलीच्या व तुकोबारायाच्या पालखी व रथ यासह पालखी तयार करण्याचा अनुभव असून गुणवत्ता व कुशल कारागिरांमुळे व धामणीच्या खंडोबा मंदिरातील म्हाळसाकांत मूर्तीचे चांदीचे सिंहासन आणि प्रभावळ व दोन चांदीच्या दरवाजाची आकर्षक कामे केल्यामुळे देवस्थानने पालखीची जबाबदारी आमच्यावर सोपवलेली होती. ही पालखी तयार करण्यासाठी दोन महिण्याचा कालावधी लागला.

या पालखीवर चंद्र,सुर्य,वाघ,ओम,सिंह,मोर,पोपट,खंडोबाचे वाहन घोडा,स्वस्तिक,विविध प्रकारची फुले आणि वेल—बुट्टीची सुबक नक्षी साकारलेली आहे.

पालखी तयार करण्यासाठी अकरा किलो वजनाचा पितळी पत्र्याचा वापर करण्यात आलेला आहे.पितळाचे सुबक काम पालखीच्या सागवानी लाकडावर करण्यात आलेले आहे.धर्मबीजेला नवीन पालखीबरोबर ग्रामीण यात्रा संस्कृतीचे व बैलगाडा शौकीनाचे प्रतिक असलेल्या दोन संगमरवरी बैलाची आकर्षक शिल्पे कासारवाडी येथील आचार्य आनंदॠषी स्कूलचे अध्यक्ष प्रा. अशोकलाल पगारीया व विलास पगारीया कल्पेश पगारीया आणि भोसरी येथील रोटरी क्लब आँफ डायनँमिकचे अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे यांनी जयपूर (राजस्थान)येथून तयार करुन आणलेली असून ही बैलाची शिल्पे धर्मबीजेच्या दिवशी(११फेब्रुवारी २४) खंडोबाला अर्पण करणार असल्याचे खंडोबा देवस्थानाचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत,शांताराम भगत,सुभाष तांबे,धोंडीबा भगत,प्रभाकर भगत,पांडुरंग भगत,राहूल भगत,राजेश भगत,ज्ञानेश्वर जाधव वाघे,सिताराम जाधव वाघे,दिनेश जाधव,नामदेव वीर यांनी यावेळी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.