आरोग्य व शिक्षणराजकीय

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका कार्यकारणी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका कार्यकारणी जाहीर…

प्रतिनिधी -समीर गोरडे

अवसरी (ता. आंबेगांव ) येथील सतिश(आण्णा) हिंगे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंबेगांव तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

घोडेगाव येथे गुरुवार दि. ११ जानेवारी रोजी मनसेची आंबेगाव तालुका बैठक आयोजीत करण्यात आली होती . बैठकीला जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे तालुका अध्यक्ष संतोष बोऱ्हाडे आणी इतर पदाधिकारी हजर होते .त्या बैठकीत सतिश (आण्णा)हिंगे यांची आंबेगाव तालुका उपाध्यक्ष पदी निवड तसेच अवसरी बु शाखा अध्यक्षपदी राहुल हिंगे व अवसरी बु उपशाखा अध्यक्षपदी आनंद गुणगे यांची नियुक्ती करण्यात येऊन जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे,तालुका अध्यक्ष संतोष बोऱ्हाडे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले . त्या वेळेस आंबेगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सोमनाथ शेटे, महेश हिंगे, निलेश हिंगे, रविंद्र हिंगे, शिवराज हिंगे, संतोष हिंगे, मनोज हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते, मा. राज ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणे आणि आंबेगाव तालुक्यातील गोरगरीबांचे प्रश्न सोडवणे याला प्राधान्य देऊ असे नवनियुक्त उपाध्यक्ष सतिश (आण्णा)हिंगे यांनी सांगीतले.अवसरी परीसरातुन त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे .

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.