आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

चांडोली बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे भारतीय ग्राहक पंचायत शाखेचे उद्घाटन सोहळा संपन्न!!

चांडोली बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे भारतीय ग्राहक पंचायत शाखेचे उद्घाटन सोहळा संपन्न!!

प्रतिनिधी -समीर गोरडे

ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांना प्रशिक्षित करण्यासाठी ग्राहक पंचायत मागील 50 वर्षापासून काम करत आहे ,व भविष्यातही हे काम पुढे नेण्यासाठी “गाव तेथे ग्राहक पंचायत”ही संकल्पना हाती घेऊन प्रत्येक गावात ग्राहक पंचायत आता शाखा सुरू करत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री तथा पुणे जिल्हा पालक रमेश टाकळकर यांनी चांडोली बु!( ता आंबेगाव) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने केले.

चांडोली बुद्रुक तालुका आंबेगाव येथे नुकतीच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या शाखेचे उद्घाटन रमेश टाकळकर यांच्या हस्ते ग्राहक पंचायतीच्या नाम फलकाचे अनावरण नारळ फोडून करण्यात आले.

यावेळी बोलताना टाकळकर पुढे म्हणाले की देशात आता पक्ष निरपेक्षपणे ग्राहकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे व त्यासाठी गाव पातळीवर प्रशिक्षित व निस्वार्थ सेवा करणारी कार्यकर्त्यांची फौज उभी करण्याचे काम ग्राहक पंचायतीने हाती घेतले आहे ,ग्राहकांची फसवणुकीची सुरुवात सकाळी दात घासण्याच्या टूथपेस्ट साबण, तथा तेलापासूनच होते एवढेच नव्हे तर कपडे ,सोने,घर ,खरेदी ,तथा शेतकऱ्याची खत,औषध,बियाणे घेताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते हे रोखण्यासाठी खरेतर शासनाने यामध्ये पुढाकार घेऊन गावोगावी जनजागृती केली पाहिजे.

परंतु शासनाच्या उदासीनतेचा फसवणूक करणारी मंडळी मोठा गैरफायदास घेत आहे म्हणून ग्राहक पंचायत आता गावोगावी शाखा स्थापन करून सामान्य जनतेला प्रशिक्षित करण्याचे काम हाती घेणार आहे.

यावेळी कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप निंबाळकर ,सहसचिव नितीन मिंडे, महिला जिल्हाप्रमुख वैशाली आडसरे, जिल्हा महिला सचिव शिल्पा अडसरे, तालुका अध्यक्ष सुभाष मावकर ,आरोग्य समिती प्रमुख योगेश चिखले ,महसूल समिती प्रमुख कैलास मावकर ,तालुका शिक्षण प्रमुख उत्तमराव राक्षे, तालुका ज्येष्ठ नागरिक विभाग प्रमुख ज्ञानेश्वर थोरात गुरुजी ,गाव शाखा अध्यक्ष अंकुश थोरात ,उपाध्यक्ष सदाशिव थोरात संघटक ,संतोष थोरात, सचिव तुकाराम काळे , अरुण इंदोरे खजिनदार कान्होबा थोरात, राजू गोडसे विजय थोरात आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश थोरात पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्तमराव राक्षे यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.