आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नाशिक येथे होणाऱ्या महाअधिवेशनात शिवसैनिकांनी उपस्थित रहावे – संपर्कप्रमुख जयंतमामा दिंडे

नाशिक येथे होणाऱ्या महाअधिवेशनात शिवसैनिकांनी उपस्थित रहावे : संपर्कप्रमुख जयंतमामा दिंडे

निफाड (वार्ताहर):- पुढील पंधरवड्यात २२ व २३ जानेवारी रोजी नाशिक येथे शिवसेनेचे महाअधिवेशन व
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे काळाराम मंदिर दर्शन, गोदाआरती तसेच जाहीर सभा होणार आहे. अयोध्या राममंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे नाशकात येणार असल्याने शिवसैनिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दिंडोरी लोकसभेचे संपर्कप्रमुख जयंतमामा दिंडे यांनी केले.

निफाड येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना संपर्कप्रमुख जयंतमामा दिंडे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर, लोकसभा संघटक प्रदीप अहिरे, उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना जयंत दिंडे म्हणाले की, अयोध्येतील राममंदिर सोहळ्याला भाजपने राजकीय रंग दिला आहे. मात्र नाशिक पुण्यनगरीत वनवासावेळी सर्वाधिक काळ वास्तव्य केलेले प्रभूरामचंद्र हे सर्वांचे होते. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळाराम मंदिरात २२ तारखेला दर्शन घेऊन शिवसेनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात होणाऱ्या महाअधिवेशनात २३ तारखेला लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकनार आहे. या ऐतिहासिक अधिवेशनाला सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही यावेळी जयंतमामा दिंडे यांनी केले.

जिल्हाप्रमुख नितीन आहेर, विक्रम रंधवे, सुधीर कराड यांनीही यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. माजी सभापती सोमनाथ पानगव्हाणे यांचा वाढदिवसानिमित्त यावेळी जयंत दिंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुधीर कराड यांनी सूत्रसंचालन केले. खंडू बोडके पाटील यांनी आभार मानले. यावेळी बैठकीस शहरप्रमुख संजय कुंदे, संजय धारराव, निखिल व्यवहारे, आबा गडाख, नितीन काळे, प्रशांत पगार, कामेश शिंदे, प्रकाश वाटपाडे, दीपक शिंदे, सुभाष आवारे, रतन गाजरे, सोमनाथ पानगव्हाणे, दत्तू भुसारे, शरद कुटे, अशपाक शेख, शाम जोंधळे, खंडू बोडके पाटील, नाना तिडके, राजू लोकणार, नितीन गवळी, समाधान खेलुकर, प्रवीण भंडारे, सतीश संगमनेरे, भाऊसाहेब खालकर, आरिफ इनामदार, रघुनाथ ढोबळे, बबन नागरे, मुकुंद गवळी, राजेश खापरे, सूरज मापारी, साजन ढोमसे, आयुष निकम, आगळे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

निफाड येथे शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या बैठकित मार्गदर्शन करतांना संपर्कप्रमुख जयंतमामा दिंडे व्यासपीठावर नितीन आहेर, विक्रम रंधवे, सुधीर कराड, निलेश पाटील व पदाधिकारी.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.