आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) येथे दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होणार लोणी मॅरेथॉन स्पर्धा!!

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) येथे दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होणार लोणी मॅरेथॉन स्पर्धा!!

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) येथे रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी व पूनित बालन ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी मॅरेथॉन २०२४ संपन्न होणार आहे या प्रसंगी पुनीत बालन ग्रूप, इंद्राणी बालन फाऊंडेशनचे अध्यक्ष मा.पुनीत बालन हे उपस्थित राहणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी वयोमानानुसार गट पाडून आयोजकांकडून विविध प्रकारची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नाव नोंदणी ग्रामपंचायत कार्यालय लोणी,धामणी, शिरदाळे,पहाडदरा, खडकवाडी,रानमळा,वाळूंजनगर, पोंदेवाडी,वडगावपीर,मांदळेवाडी, तसेच लोणी मॅरेथॉन ऑफिस (न्यु इंग्लिश स्कूल, लोणी) येथे केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९०२९५७५३८६,९८८१०२४४२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.