आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

धामणी(ता.आंबेगाव)येथील दोन सख्या मावस बंधूंचे मराठा आरक्षणासाठी अनोखे आंदोलन!!

एकाने केला छप्पलचा त्याग तर एकाने दाडी डोक्याचे केस न काढण्याचा प्रन!!

धामणी(ता.आंबेगाव)येथील दोन सख्या मावस बंधूंचे मराठा आरक्षणासाठी अनोखे आंदोलन!!
एकाने केला छप्पलचा त्याग तर एकाने दाडी डोक्याचे केस न काढण्याचा प्रन!!

गेली तीन ते चार महिन्यांपासून सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे मराठा अरक्षणसंदर्भातील आंदोलनाला भरगोस पाठिंबा मिळाला आहे. ग्रामीण भागात देखील मराठा तरुण मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत.
धामणी येथील दोन सख्खे मावस बंधू रंगनाथ जाधव आणि शांताराम जाधव या दोन बंधूंन्नी अनोखे आंदोलन करून मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. गेली तीन महिने रंगनाथ जाधव यांनी चप्पलचा त्याग केला असून जो पर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत चप्पल घालणार नाही असा पण त्यांनी केला आहे. तर त्यांचे बंधू शांताराम जाधव यांनी देखील गेली चार महिन्यांपासून धाडी,डोक्याचे केस न काढून या आंदोलनाला पाठिंबा दिला असून जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत धाडी डोक्याचे केस काढणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाचे परिसरातून कौतुक होत असून त्यांच्या या प्रामाणिक आंदोलनाला लोक पाठिंबा देत आहेत. धामणी येथे सप्टेंबर महिण्यात झालेल्या साखळी उपोषणात देखील यांचा सक्रिय सहभाग होता. आजही त्यांनी आपला शब्द राखला असून जोवर आरक्षण मिळणार नाही तोवर हा त्याग कायम असेल असे त्यांनी सांगितले.

आम्ही धामणी शिरदाळे पहाडदरा सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जे आंदोलन केले त्यात या बांधवांचा मोठा सहभाग होता. शिवाय साखळी उपोषणाच्या वेळी देखील यांनी आमरण एकदिवसीय उपोषण केले होते. तर जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटलांच्या सभेला आवर्जून उपस्थित असतात असे मराठा आंदोलक श्री.मयुर सरडे यांनी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.