आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीराजकीय

शिवसेना उपनेते, मा.खा.शिवाजीराव( दादा)आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता समारंभ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीला दिली भेट!!

शिवसेना उपनेते, मा.खा. शिवाजीराव( दादा)आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता समारंभ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीला भेट दिली.

यावेळी त्यांनी उपस्थित बैलगाडा मालक व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करून यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. चांडोली बुद्रुक गावच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी तसेच बैलगाडा घाट परिसर सुधारणा करण्यासाठी १० लक्ष रूपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रविण थोरात पाटील, रविंद्र थोरात गुरुजी, कचरुशेठ थोरात, उपसरपंच तुषार थोरात, मा.उपसरपंच पोपट थोरात व बैलगाडा संघटनेच्या सर्व सभासदांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवानशेठ पोखरकर, पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष अरुणभाऊ गिरे, युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डोके यांच्यासह बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व बैलगाडा मालक उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.