ताज्या घडामोडीसामाजिक

आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे परिसरात ज्वारीचे पीक बहरले!!बदलत्या हवामानाचा गहू, हरभरा पिकाच्या उत्पादनावर होणार विपरीत परिणाम!!

आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे परिसरात ज्वारीचे पीक बहरले!!

बदलत्या हवामानाचा गहू, हरभरा पिकाच्या उत्पादनावर होणार विपरीत परिणाम!!

शिरदाळे(ता.आंबेगाव)येथे कोरडवाहु शेती असल्याने चालू वर्षी बटाटा पीक वाया गेल्याने दुसरे महत्वाचे पीक म्हणजे ज्वारी. यावर्षी बटाटा पिकाची लागवड कमी झाली होती आणि बटाटा बिवडावर ज्वारीचे पीक हे उत्तम येते कारण बटाट्यासाठी वापरलेल्या खतांचा फायदा पुढे ज्वारीला होतो आणि ज्वारीचे पीक जोमात येते. यंदा बटाटा काढणी झाल्यानंतर ज्या क्षेत्रावर ज्वारी पेरणी झाली तसेच नंतर झालेला पाऊस यामुळे तेथील ज्वारी जोमात असून ती पोटरली असून ते निसवले आहे. तर इतर ठिकाणची ज्वारी ही अवकाळी झालेला थोडा पाऊस तसेच सततचे धुके यामुळे त्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ज्वारीवर चिकटा आणि तांबडा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून तेथे पीक जोमात नसून ते काढणीला आले आहे.

बटाटा बिवडावरील ज्वारी मात्र जोमात असून अजून थंडीचे प्रमाण वाढले तर त्याला चांगले दाणे भरतील व धान्याचा प्रश्न मिटु शकतो. वातावरणात सततच्या बदलामुळे हरबरा,मका इतर पिके देखील म्हणावी तशी जोमात नाहीत त्यामुळे थंडी अत्यावश्यक असून ती पिकांना पोषक असेल. नंतरच्या पावसाने शिरदाळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यामुळे जनावरांच्या कडब्याचा प्रश्न सुटला असून रानातील चारा देखील अजून हिरवा असल्याचे मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगितले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.