आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

नाते कलेचे त्या रक्ताशी!!या लेखमालेचे मा.भिमा आप्पा सांगवीकर यांच्याबद्दल दोन शब्द!!

नाते कलेचे त्या रक्ताशी,या लेखमालेचे मा.भिमा आप्पा सांगवीकर यांच्याबद्दल दोन शब्द ………!!

भारतमातेच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या तमाशा रंगभूमीत, खान्देशच्या पवित्र मातीत, भिका आणि भिमा सांगवीकर या दोन सुपुत्रांनी जन्म घेतला. आणि तमाशा क्षेत्रात मा.भिका भिमा सांगवीकर ( खान्देशचा कोहिनूर हिरा) म्हणुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपले नाव गाजवले. या तमाशा फडाला कै.भिका भाऊ (अण्णा) यांच्या पुण्याईने खरे वैभव प्राप्त झाले.तसेच कै.हिराबाई औरंगाबादकर हिचे संपूर्ण आयुष्याचे योगदान या तमाशा फडाला लाभले.
मा.योगेश (आबा) राजु, गणेश आणि पंकज या अष्टपैलू मुलांच्या कर्तृत्ववाने आजही हा तमाशा फड संपूर्ण महाराष्ट्रात नाव लौकीक मिळवित आहे. हा तमाशा फड, आजही संगीताचे माहेरघर म्हणून ओळखला जातो.मा. भिमा आप्पा सांगवीकर हे, संगीत गायनाचे आणि ताल,स्वर,लय या त्रिवेणी संगमाचे संगीत रत्नच आहेत,यात शंकाच नाही…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,कै.विलासराव देशमुख व दिल्लीचे अवजड मंत्री यांच्या हस्ते, १९९४ साली , राज्यस्तरीय पहिला पुरस्कार मिळाला.दुसरा पुरस्कार २०१३ – १४ साली विठाबाई नारायणगावकर या पुरस्काराने सन्मानित केले. आणि तिसरा पुरस्कार संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर, हा जीवनगौरव पुरस्कार मा. श्री. जगताप अण्णा साहेब बेल्हेकर यांच्या हस्ते मिळत आहे.

खरंच कै.अण्णांच्या आशिर्वादाने, कै.हिराबाई औरंगाबादकर आणि मायबाप रसिकांच्या आशिर्वादाने, हा पुरस्कार मिळत आहे. या सर्वांचा मी अत्यंत, ऋणी आहे , अशीच रंगदेवतेची, रसिकांची, श्वास असेपर्यंत सेवा करीत राहील , हिच भगवंताचरणी प्रार्थना करतो.
लेखक ✍🏻
शाहिर खंदारे.
ता.नेवासा
मो.८६०५५५८४३२

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.