गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार!!
शिवसेना उपनेते,मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली गारपीटग्रस्त शेतीची पाहणी!!

गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार!!
शिवसेना उपनेते,मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली गारपीटग्रस्त शेतीची पाहणी!!
आंबेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी प्रामुख्याने खडकवाडी, वाळुंजनगर,लोणी,धामणी,वडगाव पीर,कुरवंडी,कारेगाव या परिसरामध्ये गारपीट व अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होऊन झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व तहसीलदार संजय नागटिळक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच सदर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे याबाबत त्यांनी सूचना केल्या.तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आढळराव पाटील यांनी या वेळी सांगितले.
मुख्य म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात पीक घेतले असून सदर पंचनामे हे वस्तुस्थितीला आधारभूत मानून योग्यरित्या करण्यात यावे असेही आढळराव यांनी सांगितले.
आंबेगावच नव्हे तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊन झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांची उद्या मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन तातडीने मदत मिळण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी आग्रही मागणी करणार असल्याचे आढळराव पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगून आश्वस्त केले.
यावेळी त्यांच्या समवेत मा.पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, खडकवाडी गावचे सरपंच अनिल डोके व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.