पंचनामे होतील…मदतीचे काय? दोन वर्ष दुष्काळाबरोबरच अस्मानी…

पंचनामे होतील मदतीचे काय?
दोन वर्ष दुष्काळाबरोबरच अस्मानी…
गेल्या वर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये लोणी धामणी जारकरवाडी, बडेकर मळा ,खडकवाडी, लोणी रानमळा, सविंदणे या परिसरात मोठी गारपीट झाली होती.त्यामध्ये कांद्यासह टोमॅटो ,बटाटे अनेक रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. तहसीलदारांनी बांधावर येऊन पंचनामे केले ..त्याची मदत अद्यापही मिळालेली नाही…
गेल्या वर्षी 2022 जून मध्ये निसर्ग चक्रीवादळानंतर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती उदभवली त्यामध्ये खरीप पिकांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे झाले परंतु लोणी धामणी परिसराला सरकारी मदत मिळाली नाही…
रविवारी रात्री झालेल्या गारपीट आणि वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री तहसीलदारांना दिले आहेत..
आता केवळ पंचनामेच होणार की मदत मिळणार..? ????