गावाच्या विकासासाठी तरुणांनी एकत्र यावे-साहित्यिक श्री.विशाल करंडे
गावकरी चषक क्रिकेट स्पर्धेत आंबोबावस्ती संघ यशस्वी

गावाच्या विकासासाठी तरुणांनी एकत्र यावे-विशाल करंडे
गावकरी चषक क्रिकेट स्पर्धेत आंबोबावस्ती संघ यशस्वी
गावाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी तरुणांनी एकत्र आले पाहिजे, त्यासाठी गावातील सण-उत्सव आणि क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात. क्रिकेट स्पर्धे च्या माध्यमातून दरवर्षी शहरात नोकरीनिमित्त असलेले गावातील तरुण आणि मुख्य गावांतील तरुण एकत्र येतात, विचारांची देवाण घेवाण होते. गावच्या विकासासाठी हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे माजी उपसरपंच विशाल करंडे यांनी सांगितले.
काठापुर बुद्रक (ता. आंबेगाव) येथे गावकरी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात एकुण सात संघांनी सहभाग घेतला.काठापूर बुद्रुक येथे गावकरी चषक क्रिकेट स्पर्धेत गावातील एकूण सात संघ सहभागी झाले. प्रथम आंबोबावस्ती, द्वितीय- पठारवस्ती, तृतीय जोरीवस्ती, चतुर्थ गावठाण संघाने यश मिळवले.
आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील काठापूर बुद्रुक येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठान आयोजित गावकरी चषक क्रिकेट स्पर्धेत आंबोबावस्ती संघाने प्रथम क्रमांक मिळवून शिवसह्याद्री चषकावर नाव कोरले. बक्षीस वितरण प्रसंगी उपसरपंच पप्पू खूडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,सोसायटी चेअरमन कुंडलिक जोरी,तंटामुक्ती अध्यक्ष संतोष करंडे,नवनाथ जाधव,बजरंग करंडे,निलेश करंडे शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत थोरात,राजेंद्र करंडे,राजू जोरी,सचिन जाधव,ओंकार पवार अक्षय करंडे,योगेश करंडे,सोमनाथ जाधव,किरण करंडे,यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.