आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

ब्रेकिंग न्यूज – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातल्या लोणी,रानमळा, वाळुंजनगर,वडगावपीर परिसरात गारपीट!!

कांदा बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान!!

ब्रेकिंग न्यूज – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातल्या लोणी,रानमळा, वाळुंजनगर, वडगावपीर परिसरात गारपीट!!

कांदा, बटाटा पिकाचे मोठे नुकसान!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातल्या लोणी,रानमळा, वाळुंजनगर, खडकवाडी,वडगावपीर तसेच शिरूर तालुक्यातील सविंदने या गावांमध्ये गारपीट झाली आहे.भरात आलेल्या नगदी पिकांना तसेच चारा पिकांना या गारपिटीचा मोठा तडका बसला आहे.

गेले दोन-तीन दिवस या परिसरात ढगाळ हवामान आढळून येत होते.या हवामानाचा आंब्याच्या मोहरावरती देखील परिणाम झालेला आहे. यामुळे यावर्षी आंब्याचे प्रमाणही घटनार आहे.

अचानकपणे झालेल्या ढगफुटीमुळे शेतातील जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे ज्वारी,गहू,बीट,कोबी फ्लॉवर, मेथी,धना पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मंदिर विभागाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी खडकवाडी गावाच्या सरपंच कमल सूक्रे,मा.सरपंच अनील डोके, गुलाब वाळुंज, उपसरपंच एकनाथ सुक्रे, युवा नेते विशाल धुमाळ लोणी गावचे सरपंच सावळे राम नाईक, उपसरपंच आदिका खोमणे, युवा नेते पिंटू पडवळ, रानमळा सरपंच राजेंद्र सिनलकर, उपसरपंच रेखा सिनलकर ,युवा नेते सुरज सिनलकर,वाळुजनगरच्या सरपंच तृप्ती वाळुंज,उपसरपंच नवनाथ वाळुंज,वडगावपिर सरपंच मीरा पोखरकर, संजय पोखरकर,योगेश आदक या परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अचानक झालेल्या या ढगफुटीने सर्वाधिक नुकसान झाले आहे ते कांदा उत्पादकांचे!! काढणीला आलेला कांदा डोळ्यासमोर निस्तनाबूत झाल्याने अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले तसेच काढलेल्या बटाट्यावरती देखील या गारपिटीचा विपरीत परिणाम झाला असल्याचे कांदा बटाटा व्यापारी महेंद्रशेट वाळुंज यांनी सांगितले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.