ताज्या घडामोडी

शिंगवे,पारगाव परिसरात कांदा रोपांची लागवड सुरू!!मजुरीचे दर वाढल्याने मशिनच्या साह्याने कांदा लागवड!!

शिंगवे,पारगाव परिसरात कांदा रोपांची लागवड सुरू!!

मजुरीचे दर वाढल्याने मशिनच्या साह्याने कांदा लावगड!!

प्रतिनिधी -शिंगवे पारगाव

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळीच्या तडाख्यातून वाचलेली कांदा रोपे आता लागवडीसाठी सज्ज झाले आहेत .
शिंगवे पारगाव परिसरात कांदा रोपाच्या लागवडीस प्रारंभ करण्यात आला आहे, मागील तीन ते चार महिन्यापूर्वी कांदा बियाणे वाफा पद्धतीने रोपे तयार करण्यासाठी टाकण्यात आली होती, तेव्हापासून आजतागायत सातत्याने बदलत्या हवामानाने व अवकाळी पावसाने कांदा रोपे व या दरम्यान शेतकऱ्यांनी लावलेल्या कांद्यास मोठा फटका बसला, महागडी खते औषधे फवारणी करून जोपासलेल्या कांदा रोप आता शेतकरी शेतात लावगड करीत आहे.
कांदा लागवडीसाठी असलेली मजुरांची टंचाई लागवडीसाठी मजुरीचे वाढलेले दर असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मशिनच्या साह्याने शेतकरी लावगड करताना पाहायला मिळत आहे .
तालुक्यात अनेक शेतकरी हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून म्हणून कांदा लागवड करतात,परंतु युवा शेतकरी प्रविण कैलास गोरडे व सिध्देश कैलास गोरडे या दोन बंधुनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कांदा लावगड करण्याचे मशिन खरेदी करून मशिनच्या साह्याने लावगड केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात शिंगवे पारगाव, लाखणगाव, देवगाव, काठापुर, वळती, भागडी परिसरातील गावात गावांतून मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतले जात असल्याची माहिती मंडल अधिकारी सोपान लांडे, कृषी सहायक प्रमोद भोर, शेतकरी कैलास गोरडे यांनी दिली. यावेळी न्यू हॉलंड सारस ऑटोमोटिव चे एरिया मॅनेजर केशव धरम,तसेच संचालक रवींद्र पवार, आदित्य चासकर व ब्रँड हेड रमेश मुळे आणि परिसरातील सर्व शेतकरी उपस्थित होते.

एक एकरात सात टन उत्पन्नाची अपेक्षा!!

शिंगवे पारगाव परिसरातील शेतकरी माऊली पाबळे यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रात उन्हाळी गावरान कांदा कांद्याची लावगड सुरू केली आहे.शेतीची मशागत, शेणखत व खतांची योग्य मात्रा टाकून वाफे तयार करून कांदा रोपे लागवड करण्यात येत असल्याचे बाळासाहेब गोरडे व नवनात गोरडे यांनी सांगितले. हवामानाने साथ दिल्यास एक एकर क्षेत्रातून सात टन कांदा उत्पादन हमखास मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली .

मजूर टंचाईमुळे कांदा मशिनच्या साह्याने लागवड!!

तर मजुरांची टंचाई लक्षात घेता मशिनच्या साह्याने कांदा लावगड करण्यात येत असल्याचे कैलास गोरडे व भिमाजी गोरडे यांनी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.