आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न !!

पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे (महाराष्ट्र शासन अंगीकृत) पुणे अंतर्गत जिज्ञासा लोकसंचलित साधन केंद्र मंचर अंतर्गत 320 बचत गटाच्या माध्यमातून 4160 महिलांच्या आर्थिक विकासासाठी काम करत असुन ग्रामीण महिलांचे संघटन,त्यांची क्षमता बांधणी, उद्योजकता विकास यासाठी महिलांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.यामुळे अनेक महिलांना स्वयंरोजगार मिळाला,” असे जिज्ञासा लोकसंचलित साधन केंद्राच्या तालुका व्यवस्थापक मनिषा जारकड यांनी सांगितले.

मंचर (ता.आंबेगाव) येथील जिज्ञासा लोकसंचालित साधन केंद्राची 12 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सविता सैद यांच्या अध्यक्षतेखाली झाली.यावेळी डॉक्टर हेमंत वसेकर प्रकल्प संचालक माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट पुणे,अशोक चव्हाण,जिल्हा समन्वय अधिकारी पुणे,सतीश भारती सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी, अँड.स्वप्नाली पिंगळे मंचर ,CMRC अध्यक्ष सविता सैद ,व्यवस्थापक मनीषा जारकड,लेखापाल संदेश पवार, उपजीविकास सल्लागार रजनी मिर्के, सहयोगिनी,सी.आर.पी.कार्यकारणी व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित होत्या.

बँक ऑफ इंडिया चाकणचे प्रशांत साठे, शाखा प्रबंधक तसेच बँक ऑफ इंडिया नारायणगाव शाखेचे कृषी अधिकारी अर्चना पवार, बँक ऑफ इंडिया मंगरूळ पारगाव व्यवस्थापक संदीप शिंदे या सर्व शाखा अधिकारी यांच्या हस्ते 10 गटांना लोनचे चेक वाटप करण्यात आले.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अवसरी खुर्दचे सर्व अधिकारी व स्टाफ यांनी आलेल्या सर्व महिलांची एच.बी.शुगर बी.पी थायरॉईड व इतर सर्व प्रकारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच आदर्श माता पुरस्कार तिरंगा थाळी व संगीत खुर्ची या कार्यक्रमात निवड झालेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

महिलांचे हळदीकुकु कार्यक्रम घेऊन वाण वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सुप्रभा पिंगळे यांनी केली व आभार रिना वायकर मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.