अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा!!


पंचनामा मंचर प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने हा दिवस साजरा करण्यात आला.सहभागी सर्व स्वयंसेकानी घोषणा देत अमली पदार्थ विरोधात रॅली काढण्यात आली.या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस.गायकवाड,उपप्राचार्य डॉ.सालके सर,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.एस. पाटील मॅडम,पारधी सर व सर्व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर यांनी अमली पदार्थामुळे होणारे दुष्परिणाम यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.पारधी सर यांनी अमली पदार्थ विरोध या विषय प्रतिज्ञा घेतली.तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा उपस्थितांना सांगितला.डॉ.पानसरे सर यांनी उपस्थित असलेल्या सर्व स्वयंसेवकचे शिक्षकांचे आभार व्यक्त केले.

