आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

खडकवाडी(ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री.वैभव नाथा सुक्रे व उपाध्यक्षपदी श्री.शेखर आत्माराम सुक्रे यांची फेरनिवड!!

खडकवाडी(ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री.वैभव नाथा सुक्रे व उपाध्यक्षपदी श्री.शेखर आत्माराम सुक्रे यांची फेरनिवड!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून संपुर्ण राज्यात ओळख असणाऱ्या खडकवाडी गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री.वैभव नाथा सुक्रे तर उपाध्यक्षपदी श्री.शेखर आत्माराम सुक्रे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.

मागिल सन २०२२-२०२३या वर्षात अध्यक्ष,उपाध्यक्ष दोघांनी ही त्यांच्या काळातील केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

यावेळी मा.सरपंच अनिलशेठ डोके, भाजपा सरचिटणिस किरण वाळुंज,सरपंच सौ.कमल सुक्रे, उपसरपंच एकनाथ सुक्रे,दिलीप आप्पा डोके,गुलाब वाळुंज,विलास धुमाळ,बाळासाहेब सुक्रे,पैलवान अनिल सुक्रे,महेश सुक्रे,रोहीदास वाळुंज,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य किरण ज्ञानेश्वर वाळुंज,माऊली धुमाळ,संतोष पवार,शिल्पा पोखरकर,शितल सुक्रे,चैत्राली वाळुंज,छाया रणदिवे,प्रतिक्षा थोरात, मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब वाळुंज, सह शिक्षक जाधव सर,नाटे मॅडम,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.
किरण वाळुंज यांनी भविष्यात शाळेची गुणवत्ता अधिक चांगल्या पद्धतीने कशी सुधारता येईल,शाळेमध्ये विविध उपक्रम कसे राबवता येतील,स्पर्धा परिक्षा,मुलांच्या कलागुणाना वाव,विविध क्रिडा स्पर्धा या विषयावर मार्गदर्शन केले. मा.सरपंच अनिल डोके यांनी निवड झालेल्या अध्यक्ष,उपअध्यक्ष,सर्व सदस्यचे अभिनंदन केले.

आदर्श मुख्याद्यापक श्री.कांतिलाल दंडवते यांच्या हस्ते अध्यक्षाचा सत्कार करण्यात आला.भविष्यात शाळेची वाटचाल अधिक चांगल्या पध्दतीने होईल ह्या सदिच्छा या प्रसंगी त्यांनी दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.