ताज्या घडामोडीसामाजिक

काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) ला सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने झोडपले!!

काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) ला सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने झोडपले!!

काठापूर बुद्रुक गावाला सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने झोडपले.त्यामुळे आधीच खराब झालेली शेती पिके आता अजूनच खराब झाली आहेत. येथील शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर बुद्रुक या ठिकाणी दोन दिवसापूर्वी जोरदार पावसाने तडाका दिला होता. यावेळी ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान केले होते. त्यानंतर कालही सायंकाळच्या सुमारास चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला. आज पुन्हा एकदा सायंकाळी पाच वाजता जोरदार पावसाने सुरुवात केल्याने या परिसरातील शेती पिकांना पुन्हा एकदा जोरदार तडाका बसला आहे.इतर ठिकाणी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना काठापुर बुद्रुक मध्ये मात्र रोजच पाऊस जोरदार स्वरूपात येत आहे.त्यामुळे येथील शेतकरी पावसाला वैतागल्याचे पहावयास मिळत आहे.सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस जोरदार स्वरूपात पडला.या पावसामुळे आधीच जमीन दोस्त झालेल्या पिकांना पुन्हा एकदा जोडपुन काढले.सर्वच शेतात पाण्याचे तळे या ठिकाणी झाल्याचे पहावयास मिळाले.त्यामुळे काठापुर बुद्रुक येथील शेतकरी जोरदार स्वरूपाच्या पडणाऱ्या पावसामुळे वैतागला असून.शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी उपसरपंच विशाल करंडे यांनी केली आहे. ऑनलाईन पिक पाहण्यासाठी ही शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे अडचणी येत आहेत. ऊस पिकाला नुकसान भरपाई मिळत नाही.परंतु या पावसामुळे ऊस पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हक्काचे उत्पन्न देणारे ऊस जमीन दोस्त झाला आहे. त्यामुळे ऊस पिकालाही काही ना काही स्वरूपात नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच अशोक करंडे यांनी केली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.