आपल्यातील जिद्दीला मेहनतीची जोड दिल्यास यश हमखास मिळतेच- शिवसेना उपनेते, मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील
डॉ.योगिता शिर्के सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केल्या भावना

आपल्यातील जिद्दीला मेहनतीची जोड दिल्यास यश हमखास मिळतेच- शिवसेना उपनेते, मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील
डॉ.योगिता शिर्के सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केल्या भावना
आपल्यातील जिद्दीला मेहनतीची जोड दिल्यास यश हमखास मिळतेच असे प्रतिपादन मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल, केंदूर (ता.शिरूर) विद्यालयाची माजी विद्यार्थीनी डॉ.योगिता शिर्के हिने कोरियन विद्यापीठातून पी.एच.डी. मिळवल्याबद्दल केंदूर गावच्या व शाळेच्या वतीने तिचा सत्कार-सोहळा आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी आढळराव पाटील बोलत होते.
विशेषत: डॉ.योगिताने हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी परदेशी भाषा प्रशिक्षणासाठी आर्थिक तरतूद करून विद्यार्थ्यांना अनमोल भेट दिली. त्याची संकल्पना व मांडणी आदर्श शाळा वाबळेवाडीचे प्रणेते दत्तात्रय वारे गुरुजी यांनी सांगितली.
डॉ.योगिता माणिकराव शिर्के यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक अनुभव व यशस्वी होण्यासाठी केलेल्या अथक परिश्रमाची माहीती दिली. डॉ.योगिता शिर्के हिचे या यशाबद्दल कौतुक करून जीवनात यशस्वी होण्यासाठी खुप अभ्यास करण्याची तयारी ठेवण्याचे व मनात जिद्द बाळगण्याचे आवाहन आढळराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमास आदर्श शिक्षक वारे गुरुजी, सदाशिव अण्णा थिटे , रामभाऊ साकोरे,राजेंद्र रासकर, रामभाऊ सासवडे, रवींद्र करंजखेले, अनिल काशिद, सरपंच अमोल थिटे तसेच आजी माजी ग्रा पं सदस्य , माजी सरपंच व मोठ्या संख्येने विद्यार्थी व केंदूर ग्रामस्थ उपस्थित होते.