आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ संकुलात “चला आनंदाने शिकूया,स्वतःला घडवूया’ या एकदिवसीय मार्गदर्शनाचे आयोजन

जिद्द,मेहनत आणि चिकाटी हीच खरी यशाची गुरुकिल्ली:अनिल गुंजाळ

समर्थ संकुलात “चला आनंदाने शिकूया,स्वतःला घडवूया’ या एकदिवसीय मार्गदर्शनाचे आयोजन

जिद्द,मेहनत आणि चिकाटी हीच खरी यशाची गुरुकिल्ली:अनिल गुंजाळ

समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे येथे “चला आनंदाने शिकूया,स्वतःला घडवूया’ या विषयावर नुकतेच एकदिवसीय मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे चे माजी सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून या एकदिवसीय मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे उपप्राचार्य प्रा.संजय कंधारे तसेच सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनिल गुंजाळ म्हणाले कि,विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार ठेवावेत.अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.तेव्हा अपयशाने खचून न जाता आपल्या आरोग्यरुपी संपत्तीचे जतन करावे.जिद्द,मेहनत आणि चिकाटीने सातत्यपूर्ण अभ्यास करावा आणि हिच यशाची गुरुकिल्ली आहे.इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
सुख हे अवतीभवतीच असतं त्या सुखाच्या क्षणाकडे डोळसपणे आपल्याला पाहता आलं पाहिजे.छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधता येतो.आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करियर करायचे आहे ते आवडीने निवडा आणि तसे झाले नाही तर निवड केलेल्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण करा असे अनिल गुंजाळ म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संगीता रिठे यांनी प्रास्ताविक क्रीडा संचालक एच पी नरसुडे तर आभार प्रा.संतोष पोटे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.राजेंद्र नवले,प्रा.विनोद चौधरी,प्रा.सुरेखा पटाडे यांनी अथक परिश्रम घेतले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.