आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजिक

काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान!!

बाजरी, नगदी पिके, चारा पीके झालाय जमीनदोस्त!

काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान!!

बाजरी, नगदी पिके, चारा पीके झालाय जमीनदोस्त!

आंबेगाव तालुक्यातील काठापुर बुद्रुक येथे 150 मीलीमिटर पाऊस झाला.जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून खरीप बाजरी, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचप्रमाणे पालेभाज्या जनावरांचा चारा आणि ऊस की सर्वच पिके जमीनदोस्त झाली आहेत.

काठापुर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. येथे ताबडतोप पंचनामे करावेत अशी माघणी.मा.चेअरमन पांडुरंग करंडे यांनी केले आहे. काल दुपारी तिन ते सायंकाळी साडे सहा या दरम्यान मोठ्या स्वरूपाचा मुसळदार पाऊस झाला. या पावसाचा फटका शेती पिकांना बसला आहे यामध्ये बाजरी मका कडवळ जनावरांचा चारा सोयाबीन पालेभाज्या सोयाबिन आणि मोठ्या प्रमाणावर उसाचे नुकसान झाले आहे.शासनाच्या वतीने कृषी विभाग प्रथम दर्शनी अहवाल तहसीलदार यांना देणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पंचनामे सुरू होतील परंतु ताबडतोब या ठिकाणी पंचनामे सुरू होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ज्या शेतकऱ्यांचे विमा आहेत त्यांना विमा भरपाई मिळेल.परंतु ज्यांच्याकडे विमानाही त्यांनाही नुकसान भर दिली पहिले अशी मागणी मा.उपसरपंच विशाल करंडे यांनी केली आहे. काढणीला आलेली बाजरी सपाट झाली आहे.तसेच काढणी केलेली बाजरी ही पाण्यात तरंगत होती. त्यामुळे नुकसान मोठे झाले आहे. एकंदरीतच हा पाऊस काठापुर बुद्रुक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाला. पावसाचे प्रमाण दीडशे मिलिमीटर होते. 65 मिलिमीटर च्या पुढील पावसाला अतिवृष्टी म्हणून घोषित केले जाते. त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी झाला आहे. जनावरांची चारा पिके व सपाट झाल्याने आधीच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता .त्यात अजूनच चाऱ्याचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी ही अडचणीत सापडला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता शेती पिकाचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच अशोक करंडे आहे

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.