आरोग्य व शिक्षण

नगराध्यक्ष चषक स्पर्धेत टोकळे सहर्ष, शौर्य साळुंखे, मुचंडीकर श्रीकांत विजेते!!

नगराध्यक्ष चषक स्पर्धेत टोकळे सहर्ष, शौर्य साळुंखे, मुचंडीकर श्रीकांत विजेते!!

माळशिरस-पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.आप्पासाहेब देशमुख बहुउद्देशीय संस्था संचलित श्रीनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज आयोजित भव्य राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत टोकळे सहर्ष, शौर्य साळुंखे आणि श्रीकांत मुचंडीकर यांनी अनुक्रमे दहा वर्ष, पंधरा वर्षे व खुल्या वयोगटात प्रथम क्रमांक मिळवले.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सर्व नगरसेवक व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. स्पर्धेसाठी सातारा,सांगली, पुणे, बारामती, लोणंद इंदापूर, पंढरपूर, फलटण, धाराशिव या ठिकाणाहून 125 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे बक्षीस वितरण माननीय आप्पासाहेब देशमुख आणि विद्यालयाचे प्राचार्य योगेश गुजरे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे दहा वर्षे वयोगट-
प्रथम – पोकळे सहर्ष (सांगली), द्वितीय- गोरे सानवी (बार्शी), तृतीय – जाधव सार्थक, चतुर्थ –
बाळापूरे अनन्या (उघडेवाडी), पाचवा – माने श्रेया (अकलूज)

15 वर्षे वयोगट – प्रथम साळुंखे शौर्य (पंढरपूर), द्वितीय घाटे तन्मयी (सातारा), तृतीय शेटे सोहम (बार्शी), चतुर्थ जाधव रक्षिता (अकलूज), पाचवा उबाळे यशवंत.
तर खुल्या गटात प्रथम श्रीकांत मुचंडीकर (पुणे), द्वितीय कांबळे दीपंकर (फलटण), तृतीय माने प्रमोद, चतुर्थ नांदले मिलिंद (फलटण), पाचवा मोहिते सचिन (सातारा) यांनी क्रमांक पटकावले.
तर सर्वात लहान खेळाडू रिध्वी शिंदे (पुणे), सर्वात ज्येष्ठ खेळाडू जयकुमार तोडकरी (धाराशिव), उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू सर्जे ज्ञानेश्वर (माळशिरस) उत्कृष्ट पुरुष पालक टोकले सचिन (सांगली), उत्कृष्ट महिला पालक पुनम बाळापुरे (उघडेवाडी) यांनी क्रमांक मिळवले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीनाथ विद्यालय चे सर्व कर्मचारी वर्ग, रुद्रा चेस ॲकॅडमी अकलूज, ब्रिलियंट चेस अकॅडमी अकलूज, श्री चेस अकॅडमी पंढरपूर, ब्रिलियंट चेस अकॅडमी सातारा यांनी सहकार्य केले. स्पर्धेसाठी सहाय्यक पंच म्हणून सौ कर्णक्षि जाधव व अनिता बावळे यांनी तर मुख्य पंच म्हणून अभिजीत बावळे यांनी काम पाहिले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.